प्रवासात दीड लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

ओतूर- माहेरी आलेल्या एका प्रवासी महिलेचे बॅगेतून सुमारे दीड लाखांचे दागिने चोरीस गेले आहे. ही घटना शनिवारी (दि. 25) बनकरफाटा ते ओतूर दरम्यान जीपमध्ये घडली असून अज्ञात चार महिलांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली. शितल शितल स्वप्नील शिंदे (वय 25 रा. बल्लाळवाडी, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शितल शिंदे या मुंबई येथून ओळखीच्या जीपमधून बनकरफाटा (ता. जुन्नर) येथे आल्या. याप्रवासा दरम्यान, शिंदे यांनी आपली बॅग सीटच्या खाली ठेवली होती. त्यामध्ये सोन्याचे गंठण, कानातील झुमके, नेकलेस अशा सुमारे 1 लाख 46 हजार 250 रुपांचे दागिने होते. तर या प्रवसात त्यांच्या शेजारी बसलेल्या चार महिलांपैकी एका महिलेने जीपची खिडकी उघडण्यास सांगून लक्ष वेधून इतर महिलांनी ही बॅग लांबवली तसेच ओतूर येथे उतरल्यावर आपली बॅग चोरी झाल्याचे लक्षात आल्याचे शिंदे यांनी फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस हवालदार तपास के. एम. पाटोळे करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)