प्रवाशाला लोकलखाली ढकलणाऱ्या हत्येप्रकरणी महिलेला अटक

मुंबई : मुंबईतील मुलुंड रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला लोकलखाली ढकलल्याच्या प्रकरणात पहिली अटक झाली आहे. रेल्वे पोलिसांनी मनिषा ललित खाकडिया या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.

दीपक पटवा हे शनिवारी दुपारी मुलुंड स्टेशनच्या फलाट क्रमांक 3 वरुन प्रवास करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एका महिलेला त्यांचा धक्का लागला. तिच्यासोबत बाचाबाची सुरु असताना एक जण मध्ये पडला आणि दीपक यांचे त्याच्यासोबतही खटके उडाली. दोघांनी दीपक पटवा यांना रेल्वे ट्रॅकवर ढकलले, त्याचवेळी लोकल आल्यामुळे त्याखाली चिरडून पटवा यांचा मृत्यू झाला. 56 वर्षीय दीपक पटवा मुलुंड पश्चिमेला राहत होते. पटवा यांच्या मेहुण्याच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला. कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला होता. महिलेला अटक झाली असून पुरुषाचा शोध पोलिस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)