प्रवाशांसाठी अतिरीक्त तिकीट खिडकी

पुणे – प्रवाशांच्या सेवेसाठी पुणे ते लोणावळा दरम्यान येणाऱ्या आकुर्डी रेल्वे स्थानकात एक अतिरिक्त तिकीट खिडकी मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर उपस्थित होते.

आजवर आकुर्डी स्थानकात डाऊन मार्गावरील प्लॅटफॉर्म 1 येथे तिकीट खिडक्‍या होत्या. आता नव्याने अप मार्गावरील प्लॅटफॉर्म दोनवर तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे. या तिकीट खिडीमुळे प्रवाशांची सोय होणार असून त्यांना प्लॅटफॉर्म एकवर येण्याची गरज भासणार नाही. पुढील काळात येथे आरक्षित तिकीट देखील उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे देऊस्कर यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)