प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा दरवाजा तुटला

वाई बसस्थानकातील घटना
ओझर्डे,  (वार्ताहर) – प्रवाशांनी फुल्ल भरलेल्या वाई-वाठार एसटीचा दरवाजा एसटी सुरु होताच तुटला. ही घटना सोमवारी पाच वाजण्याच्या सुमारास वाई बसस्थानकात घडली.
वाईहून वाठारकडे जाणारी एसटी सोमवारी साडेचार वाजता वाई बसस्थानकात लागली होती. यावेळी विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी एसटी फुल्ल भरली. एसटीची वेळ झाल्याने चालकाने एसटी सुरु केली आणि एसटीचा दरवाजा अचानक तुटून खाली पडला. दरवाजासोबत काही प्रवासी विद्यार्थीही खाले पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुर्घटना झाली नाही.
वाई ते वाठार हे 27 किलोमीटरचे अंतर आहे. या अंतरात एसटीचे 16 थांबे आहेत. विशेषत: या बसला वाईत महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे वाई-वाठार या एसटीच्या फेऱ्यात वाढ करण्याची मागणी वारंवार होत आहे. मात्र याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष झाले आहे. आज दरवाजा तुटण्याचा घडलेला प्रकार हा जादी प्रवासी भरल्यामुळेच घडला आहे. त्यामुळे आता तरी एसटी प्रशासनाने ज्यादा बसेस सुरु करावी, अशी मागणी प्रवाशांसह विद्यार्थ्यांमधून होत आहे.
दरम्यान, दरवाजा तुटल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखांकडे केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)