प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज

File photo

435 बसेस सुटणार : विदर्भ, मराठवाड्यासाठी बसेस


कॅन्टोन्मेंट मैदानात बसचे उद्‌घाटन करुन सुरूवात

पुणे – दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) जादा बसेसची सोय केली आहे. यासाठी प्रथमच खडकी कॅन्टोन्मेंट येथील मैदानातून मराठवाडा, विदर्भात बसेस सोडण्यात येणार आहेत. दि.6 नोव्हेंबरपर्यंत या बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्या उपस्थितीत गुरूवारी प्रथम नागपूरसाठी बस रवाना करण्यात आली.

दि. 1 ते 6 नोव्हेंबरदरम्यान नियमित बसेसबरोबरच जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. प्रवाशांसाठी या कालावधीत शहरातील शिवाजीनगर आणि स्वारगेटव्यतिरिक्त खडकी येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड मैदानातून बसेस सोडण्यात येणार आहेत. यासाठीचे आरक्षण यापूर्वीच सुरू करण्यात आले असून महामंडळाच्या संकेतस्थळावरून किंवा मोबाइल ऍपवरून आरक्षण करता येणार आहे. गुरूवारी विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्या हस्ते मैदानावरुन सुटणाऱ्या पहिल्या बसचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी दीपक घोडे, शिवाजीनगर आगार व्यवस्थापक अनिल भिसे, ज्ञानेश्‍वर रणवरे आदी उपस्थित होते. या ठिकाणावरुन दि.6 तारखेपर्यत एकूण 435 बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथून अशा सुटतील गाड्या –
1) शिवाजीनगर बसस्थानक – नियमित जादा वाहतुकीशिवाय नाशिक, औरंगाबादसह आदी.
2) कॅन्टोन्मेंट बोर्ड मैदान – नागपूर, अकोला, अमरावती, अंबड, अहमदपूर, अंबाजोगाई, बीड, औसा, हिंगोली, जाफराबाद, जालना, लातूर, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परळी, परभणी, तुळजापूर, वाशीम, यवतमाळ, बुलढाणासह आदी.
3) पिंपरी-चिंचवड बसस्थानक – नियमित सुटणाऱ्या बसेस व्यतिरिक्त कोल्हापूर, चिपळूण, लातूर आदी.
4) स्वारगेट – नियमित सुटणाऱ्या बसेस व्यतिरिक्त कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बारामती, भोर आदी.

मैदान आकाराने लहान….
दरवर्षी शिवाजीनगर येथील सीओईपी महाविद्यालयातील मैदानावरुन बसेस सोडण्यात येतात. मात्र, यावर्षी हे मैदान उपलब्ध न झाल्याने खडकी येथील मैदानावरुन गाड्या सोडण्यात येत आहेत. या मैदानावरुन बसेस सोडण्यास सुरवात झाली असली तरी तुलनेने हे मैदान कमी पडत असल्याचे चित्र आहे. यामुळे जादा गाड्या आत आणण्यासाठी मर्यादा येणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मैदान आकाराने लहान असले तरी गाड्यांचे योग्य नियोजन करण्यात आल्याचे आगार व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)