प्रवाशांच्या बाजुने उभे रहाणे धिंगाणा कसा?

राजकीय पक्षाच्या त्या माजी पदाधिकाऱ्याचा सवाल

सातारा – एस टी बससाठी तिष्ठत उभे रहाणाऱ्या प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या बाजुने उभे रहाणे धिंगाणा कसा असा सवाल एका राजकीय पक्षाच्या त्या माजी पदाधिकऱ्याने विचारला असून यापुढेही सामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकऱ्याने सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात दारू पिऊन धिंगाणा घातल्याची बातमी दैनिक प्रभातमध्ये मंगळवारच्या अंकात प्रसिध्द झाली होती.याबाबत बोलताना या पदाधिकाऱ्याने हा खुलासा केला आहे.काही दिवसांपुर्वी गोलमारूती मंदीर ते बोगदा परिसरात ही कथित घटना घडली होती.

राजकीय स्पर्धेतून आकसापोटी कोणीतरी ही चुकीची माहिती पसरवली असल्याचेही या माजी पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.सातारा शहरातील बस वाहतूक अतिशय धोकादायक आणि अनियमित आहे.प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो.

विशेषत: समर्थनगर परिसरात प्रवाशांची गैरसोय होते.चालक आणि वाहक प्रवाशांना व्यवस्थित उत्तरे देत नाहीत.प्रवासी आणि नागरिक अनेकवेळा तक्रारी घेउन माझ्याकडे येतात.या गैरसोयीला वाचा फोडण्यासाठी प्रवाशांच्या बाजुने उभे राहणे चुकीचे आहे का असाही सवाल त्यांनी केला आहे.

एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी अतिशय चांगली प्रतिमा आहे.पक्षातर्फे विविध आंदोलने करुन मी समस्यांना वाचा फोडली आहे.त्यामुळे राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी केलेल्या कारस्थानांचा काहीही परिणाम होणार नाही.यापुढेही माझे समाजकार्य अविरत सुरु राहणार आहे,अशी माहितीही या पदाधिकाऱ्याने दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)