प्रवाशांची सुरक्षितता विमान कंपन्यांनी केंद्रस्थानी ठेवायला हवी 

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांची अपेक्षा 

नवी दिल्ली: प्रवाशांच्या सुरक्षिततेला कोणत्याही वाहतूक सेवा कंपन्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे असे सांगून विमान कंपन्यांनी प्रवाशांची सोय आणि सुविधेला केंद्रस्थानी ठेवावे असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज सांगितले. भारताची हवाई वाहतूक क्षेत्रातली कामगिरी विशद करणाऱ्या कॉफी टेबल बुक आणि आर्थिक परिणाम अहवालाचे प्रकाशन केल्यानंतर ते आज नवी दिल्लीत उपस्थितांना संबोधित करत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विमानतळांवर प्रवाशांसाठी त्रास मुक्त वातावरण राखण्याची सरकार, धोरणकर्ते आणि व्यापारी आस्थापनांनी खातरजमा करावी. दर्जेदार पायाभूत सुविधा पुरवल्या आणि विमान कंपन्यांनी प्रभावी, ग्राहक सेवा पुरवल्यास, देशांतर्गत हवाई दळणवळण वाढवून ते सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना चालना मिळेल असे ते म्हणाले.

पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी हे सर्वात प्रभावी साधन असल्याचे ते म्हणाले.
दळणवळण ही आर्थिक विकासाची गुरुकिल्ली असल्याचे सांगून हवाई वाहतूक उद्योगात विकासाला मोठा वाव आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातल्या वृद्धीचा पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होऊन त्यामुळे त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर अनेक पटींनी चांगला प्रभाव जाणवेल असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)