प्रवाशांची लूट थांबणार, खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्यात येणार

मुंबई : सुट्यांच्या हंगामाच्या काळात अनेक खासगी प्रवासी वाहने भाडेदरात अवाजवी वाढ करतात. या भाडेवाढीला चाप बसण्यासाठी शासनाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तर उच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशानुसार खासगी व कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

यानुसार आता खासगी वाहनांना गर्दीच्या काळात एसटीच्या तुलनेत जास्तीत-जास्त दीडपट भाडे आकारता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. तसेच यापुढे अधिक भाडे आकारणाऱ्या वाहनाचा परवानाही रद्द केला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

-Ads-

यावेळी बोलताना दिवाकर रावते म्हणाले, वाहतुकीचे भाडेदर हे राज्य परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित करण्यात येतात. हे भाडेदर विचारात घेऊन खासगी वाहनाच्या संपूर्ण बससाठी प्रति कि.मी. भाडेदर हे त्याच स्वरुपाच्या एसटी महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडेदराच्या ५० टक्केपेक्षा (दीडपटीपेक्षा) अधिक राहणार नाही. या निर्णयामुळे गर्दीच्या हंगामाच्या काळात प्रवाशांची अडवणूक करुन केली जाणारी लुबाडणूक थांबविण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)