प्रवक्‍त्यांच्या निवडीसाठी कॉंग्रेसने उत्तरप्रदेशात घेतली लेखी परीक्षा

भाजपने प्रक्रियेला ठरवले विनोदी
लखनौ – प्रवक्‍त्यांची निवड करण्यासाठी कॉंग्रेसने उत्तरप्रदेशात चक्क लेखी परीक्षा घेतली. परीक्षा देणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. चर्चेचा विषय झालेल्या कॉंग्रेसच्या या निवड प्रक्रियेची विनोदी अशा शब्दात भाजपने खिल्ली उडवली.

प्रदेश कॉंग्रेसच्या येथील मुख्यालयात गुरूवारी प्रवक्‍त्यांच्या निवडीसाठीची लेखी परीक्षा झाली. पक्षाच्या 65 नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ती परीक्षा दिली. पक्षाच्या काही माजी प्रवक्‍त्यांचाही त्यामध्ये समावेश होता. प्रामुख्याने उत्तरप्रदेशची भौगोलिक रचना आणि त्या राज्यातील निवडणुकांशी संबंधित 14 प्रश्‍न लेखी परीक्षेत विचारण्यात आले. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारांचे अपयश, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारांची कामगिरी आदींशी संबंधित प्रश्‍नांचाही त्या परीक्षेत समावेश होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लेखी परीक्षा झाल्यानंतर प्रवक्तेपदासाठी इच्छूक असणाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या लेखी परीक्षेचे कॉंग्रेसकडून जोरदार समर्थन करण्यात आले. प्रवक्तेपद सांभाळण्यासाठी मूलमूत बाबींचे ज्ञान आणि राज्याविषयी बारीकसारीक माहिती असणे आवश्‍यक आहे. त्यातून ही परीक्षा घेण्यात आल्याचे कॉंग्रेसने म्हटले. याआधी गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटकातही कॉंग्रेसने अशी प्रक्रिया राबवली होती. याआधी उत्तरप्रदेश कॉंग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी 22 जण सांभाळत होते. नव्या नियुक्तींसाठी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी प्रवक्ते मंडल बरखास्त केले आहे.

दरम्यान, कॉंग्रेसच्या या निवडप्रक्रियेची भाजपने खिल्ली उडवली. जनतेने प्रत्येक परीक्षेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अनुत्तीर्ण केले आहे. अशावेळी प्रवक्ते काय करणार? पदासाठी परीक्षा घ्यावी लागण्याच्या घडामोडीतून कॉंग्रेसमध्ये कार्यकर्तेच शिल्लक नसल्याचे सूचित होते, अशी प्रतिक्रिया उत्तरप्रदेश भाजपचे प्रवक्ते चंद्रमोहन यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)