प्रलंबित मागण्यांसाठी रेल्वे स्टेशन मास्तरांचे देशव्यापी उपोषण

लोणावळा – रेल्वे स्टेशन मास्तरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया रेल्वे स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या वतीने शनिवारी पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय देशव्यापी उपोषणात लोणावळ्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑन ड्युटी उपोषण करत सहभाग नोंदविला आहे. ऑल इंडिया रेल्वे स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या वतीने त्यांच्या 11 मागण्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री धनंजय चंद्रात्रे यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी उपोषण पुकारण्यात आले आहे.
लोणावळ्यात पुकारण्यात आलेल्या उपोषणात संघटनेचे मुंबई मंडल सचिव जी. पी. यादव, उपाध्यक्ष डी. के. सिंह, लोणावळा अध्यक्ष आर. के. भारद्वाज, आर. पी. सिंग, बी. बी. हिर्लेकर, पी. बी. राजगुरू यांच्यासह उपप्रबंधकांनी सहभाग नोंदविला आहे.

या वेळी संघटनेचे मुंबई मंडल सचिव जी. पी. यादव म्हणाले की, आमचे उपोषण हे लोकशाही मार्गाने प्रामाणिकपणे पार पाडत असून, यामुळे रेल्वेच्या कोणत्याही कामात अडथळा येणार नाही. याची संघटनेच्या वतीने दक्षता घेण्यात आली आहे. रेल्वेचे स्टेशन मास्टर हे भारतीय रेल्वेचा कणा असून, ते रेल्वेचे ब्रॅंड अँम्बेसीडर (दूत) म्हणून संबोधले जात आहे. परंतु स्टेशन मास्तर हे अत्यंत महत्वाच्या पदावर असताना रेल्वे प्रशासनाकडून आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच संघटनेच्या मूलभूत मागण्यांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एम. ए. सी. पी. माध्यमातून मिळणारी बढती (ग्रेड पे 5400) स्टेशन मास्तरांना देण्यात यावी. देशभरात अनेक ठिकाणी स्टेशन मास्तरांना 12 तास ड्युटी करावी लागते, असे अमानवीय रोस्टर रद्द करण्यात यावे. ज्या पासून गाडी संचालनामध्ये धोका निर्माण होऊ शकतो. ड्युडी समाप्त झालेल्या स्टेशन मास्तरांना ऐनवेळी घरी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध नसतात, अशावेळी त्यांना स्टेशनवर निवासाची व्यवस्था करून देण्यात यावी.

त्याचप्रमाणे प्रशासनाने तयार केलेले स्टेशन डायरेक्‍टर पद हे अनुभवी व वरिष्ठ स्टेशन मास्तरांना देण्यात यावे. नवीन पेन्शन योजनेला होणारा विरोध पहाता ती तत्काळ रद्द करून, जुनी पेन्शन योजना पुन्हा अंमलात आणावी. अशा प्रकारच्या मागण्या ऑल इंडिया रेल्वे स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)