प्रमुख मंडळांच्या गणेश मूर्तींची “क्रेझ’

पिवळे पितांबर, लाल सोवळे, डोळे, सोनेरी मुकूट या बाबींना कटाक्षाने पाहिले जातेय

पुणे – यंदाही मानाच्या गणरायाच्या वैविध्यपूर्ण मूर्ती आकर्षक ठरत आहे. त्याचबरोबर यावर्षी घरोघरी “श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी शारदा गणपती, गरूड गणपती, बाबू गेनू मंडळाचा नवसाचा गणपती, जिलब्या गणपती, हत्ती गणपती, त्वष्टा कासार गणपती या प्रमुख मंडळांच्या मूर्तींची यंदा क्रेझ वाढली आहे. या प्रमुख मंडळांची मूर्तीसाठी सर्वाधिक मागणी होत आहे.

चित्रपट, दूरचित्रवाणींवरील प्रमुख भूमिकांचा परिणाम दरवर्षी गणेशोत्सवात दिसून येतो. याचे प्रतिबिंब गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये उमटले होते. यंदा मात्र उलट स्थिती दिसून येत आहे. पारंपरिक वेशातील गणेश मूर्तीला यावर्षी पसंती कायम आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख मंडळांच्या गणेश मूर्ती हेच वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. या प्रमुख मंडळाची गणेश मूर्ती आता सर्वत्र उपलब्ध होत आहेत. यापूर्वी मानाच्या गणपती आणि दगडूशेठ गणपतींची मूर्ती बाजारात असायची. आता अन्य मंडळाच्या मूर्तीही बाजारात उपलब्ध होत असल्याने, त्या मूर्तींला पसंती वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

गणेश मूर्ती वैविध्यपूर्ण असले तरी, गणरायाची मूर्ती घेताना पिवळे पितांबर, लाल सोवळे, डोळे, सोनेरी मुकूट या बाबी यंदाही भाविकांकडून कटाक्षाने पाहिले जात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. गणेशोत्सवात पारंपरिक मूर्ती घेण्याचा कल असतो. मात्र, काळ बदलला आहे. ही परंपरा टिकली असली तरी विविध आकारातल्या व वेषभूषा असलेल्या गणेश मूर्ती यंदा बाजारात दाखल झाल्या असून, या मूर्तीही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

गणेश मूर्ती विक्रेते सचिन डाखवे म्हणाले, दरवर्षी कसबा, तांबडी जोगेश्‍वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग, केसरी वाडा या मानाच्या पाच आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या मूर्तींना प्रचंड मागणी असते. यंदा मात्र अन्य प्रमुख मंडळांच्या गणेश मूर्तींना मागणी वाढली आहे. या मंडळांच्या मूर्ती यावर्षी आकर्षण ठरत आहे. काळानुसार बदल होत असतानाही मूर्ती घेताना कलही बदलत चालला आहे. शारदा गणपती, नवसाचा गणपती, गरूड गणपती, जिलब्या गणपती, हत्ती गणपतींना यंदाही मागणी जास्त आहे. बाजारात या मूर्तीं घेण्यासाठी बुकींगही मोठ्या प्रमाणात होत आहे.

शारदा गणेश मूर्तींचे आकर्षण
अखिल मंडई मंडळाच्या यंदा 125 वर्षानिमित्त शारदा गणेश मूर्ती वैविध्य व वेगवेगळ्या रचनेत बाजारात उपलब्ध झाले आहेत. शारदा गणेश विराजमान असलेली मूर्तीना सर्वात आकर्षण ठरत असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मागणी वाढली आहे. वेगवेगळ्या आकारातील शारदा गणेशची मूर्तींची पसंती वाढली आहे.

वाढत्या उंचीच्या मूर्तीची ट्रेंड वाढली
पुण्यात अर्धा ते एक फूटापर्यंत गणेश मूर्तीची विक्री होत असे. मात्र, मुलांच्या हौशेखातर घरी दीड ते दोन फूट उंचीच्या गणेश मूर्तीही बसवित आहेत. घरांत गणेश मूर्तीही उंचीही वरचवेर वाढणार आहे, असे चित्र पाहावयास मिळत आहे. घरांत मूर्तीसाठी मोठ्या उंचीची मागणी होत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी अडीच फूटांपर्यत मूर्ती तयार करावे लागतील. मात्र, आता वाढत्या उंचीच्या मूर्तीची ट्रेंड वाढली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)