प्रभाससोबत झळकणार महेश मांजरेकर

प्रभासच्या ब्लॉकबस्टर “बाहुबली-2’नंतर त्याच्या आगामी “साहो’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. “बाहुबली 2’ला मिळालेल्या यशानंतर प्रभासच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे त्याच्याकडून प्रेक्षकांच्या असलेल्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत. आता त्याच्या आगामी “साहो’ या चित्रपटाविषयीची माहिती उघड होऊ लागली. ही एक टॉलीवूड चित्रपट आहे. पण त्यातील एक विशेष बाब म्हणजे यात अनेक बॉलीवूडमधील सितारे दिसणार आहेत.

यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार “साहो’ या चित्रपटात प्रभाससोबत मराठमोळे अभिनेते महेश मांजरेकरही झळकणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये मल्ल्याळम चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल आणि अरुण विजयसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त आहे. तसेच
“साहो’ हा आतापर्यंतचा बहुचर्चित ऍक्‍शनपट ठरणार आहे. कारण जागतिक पातळीवरील प्रसिद्ध ऍक्‍शन कोरिओग्राफर्सची निवड चित्रपटातील काही थरारक दृश्‍यांसाठी करण्यात आली असून, ते सुद्धा यात फार योगदान देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)