प्रभावी व परिणामकारक उपचारासाठी आरोग्यसुविधेचा लाभ रुग्णांच्या घरापर्यंत – मुख्यमंत्री

नागपूर: समाजातील गरीब व गरजू लोकांपर्यंत प्रभावी व परिणामकारक आरोग्यसुविधेचा लाभ त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत असून गरीब व गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमार्फत राज्यातील अत्यंत गरजू व गरिबांना खर्चिक व तातडीच्या उपचारासाठी 450 कोटी रुपये उपलब्ध केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचवू शकलो. केवळ उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून गरजू नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील नागरिकांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरिष महाजन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व औषध प्रशासन मंत्री गिरिश बापट, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज्यभरातून आलेले मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गरजू आणि गरीब रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्यभर आरोग्य शिबिरांचे आयोजन यशस्वीपणे करण्यात येत आहे. जवळपास20 लाख रुग्णांची आरोग्य तपासणी याअंतर्गत करण्यात आलेली आहे. नागपूर येथेही  अटल आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातील व देशातीलही नामांकित डॉक्टर या शिबिरात उपस्थित राहून रुग्णांची आस्थेवाईकपणे तपासणी करीत असून आरोग्य सुविधा देत आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. आरोग्य शिबिरांच्या आयोजनामध्ये विविध सामाजिक संघटना तसेच कंपन्यांच्या ‘सीएसआर’ निधीचा मोठा हातभार लागलेला आहे. आरोग्य शिबिरांची संकल्पना अभिनव असून याद्वारे रुग्णांना सुविधा मिळत आहे. अटल आरोग्य महाशिबिरांतर्गत 32 ओपीडीमधून रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यात आली आहे. शिबिरातील तपासणीनंतर आवश्यकता भासल्यास रुग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत. अशाप्रकारची आरोग्य शिबिरे नक्कीच दिलासादायक ठरत आहे.

विविध आरोग्य योजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत 50 कोटी लोकांना लाभ देण्यात येणार आहे. राज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतूनही रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. राज्यातील 90 टक्के नागरिकांना एक हजारपेक्षा जास्त रोगांकरिता मोफत उपचार मिळण्याची सुविधा या अंतर्गत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून साडेचारशे कोटी रुपयांची मदत देण्यात आली. यामुळे अनेकांचे प्राण वाचले. याशिवाय कर्णबधिर, लहान मुलांवरील हृदय शस्त्रक्रिया तसेच अन्य आजारांवरही नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)