‘प्रभात’ वर्धापनदिनी मान्यवरांची मांदियाळी

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन करताना महापौर सुरेखा कदम, दै. प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, उद्योजक कृष्णा वारे, वाळुंजचे सरपंच रणजित बेळगे, नगरसेवक महेश बोरुडे, वरिष्ठ जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, वाणिज्य विभागाचे रवीकुमार इंडी, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर एन. एस. पाटील, विशेष प्रतिनिधी दिलीप राणे, नगर आवृत्तीचे वृत्तसंपादक जयंत कुलकर्णी व इतर.

नगर – सातत्याने जिल्ह्यातील विविध प्रश्‍न मांडून निर्भिड पत्रकारितेचा मानदंड ठरलेल्या दैनिक “प्रभात’चा 14 वा वर्धापन दिन राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, वैद्यकीय क्षेत्रासह प्रशासकीय अधिकारी, मान्यवर, वाचकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला. दैनिक “प्रभात’च्या आजवरच्या वाटचालीचे उपस्थितांनी तोंडभरून कौतुक केले.

नगर शहरातील नगर-पुणे मार्गावरील अक्षता मंगल कार्यालयात वर्धापन दिनाच्या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी आकर्षक कमान, रांगोळी रेखाटण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजता महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी उद्योजक कृष्णा वारे, वाळुंजचे (ता.पाथर्डी) सरपंच रणजित बेळगे, नगरसेवक महेश बोरुडे, दैनिक “प्रभात’चे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, वरिष्ठ जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, वाणिज्य विभागाचे रविकुमार इंडी, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर एन. एस. पाटील, विशेष प्रतिनिधी दिलीप राणे, नगर आवृत्तीचे वृत्तसंपादक जयंत कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जनार्दन लांडे पाटील, प्रा. डी. के. वैद्य, बाबासाहेब गर्जे, आदी उपस्थित होते.

दै. “प्रभात’वर प्रेम करणाऱ्या वाचकांच्या गर्दीने मंगल कार्यालय फुलून गेले होते. अल्पोपाहाराचा आस्वाद घेत उपस्थितांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले, सदस्या हर्षदा काकडे, डॉ. विखे कारखान्याचे अध्यक्ष सुजय विखे, साई आदर्श मल्टिस्टेटचे प्रमुख शिवाजीराव कपाळे, डॉ. सुधा कांकरिया, डॉ. प्रकाश कांकरिया, मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, पीपल्स रिपब्लिकनच्या गौतमी भिंगारदिवे, राष्ट्रवादीचे नगर तालुकाध्यक्ष दादा दरेकर, उद्योजक संतोष कानडे, राहुरी पंचायत समिती सभापती मनीषा ओहळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी अध्यक्षा निर्मला मालपाणी, संताजी सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ डोळसे, छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर जेजुरकर, श्रीकांत ढगे, अर्बन बॅंकेचे उपाध्यक्ष नवनीत सुरपुरिया, पत्रकार डॉ. बाळ बोठे पाटील, प्रकाश येळवंडे, प्रेस क्‍लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, सचिव महेश महाराज देशपांडे, विनोदकुमार गांधी, सुभाष चिंधे, प्रकाश भंडारे, दीपक खोसे, डॉ. दिलीप बागल, नगरसेवक अनिल शिंदे, सुमन काळापहाड, सुरेश भिंगारदिवे, आदींसह शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, व्यापार, शासकीय अधिकारी, वाचक, आदींनी “प्रभात’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

वर्धापनदिनानिमित्त दैनिक “प्रभात’च्या कार्यालयालाही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दैनिक “प्रभात’ने 2003 मध्ये नगरमध्ये पाऊल टाकले. तेव्हापासून गेल्या 14 वर्षांत जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या विविध प्रश्‍नांबाबत “प्रभात’ने वारंवार आवाज उठविला. विविध प्रश्‍नांवरील सडेतोडे लिखाणातून समाजाचे अचूक चित्रण उभे केले. अनेक समस्यांना वाचा फोडून त्यातील काही प्रश्‍न तडीस लावले. राजकीय अंदाज वर्तवितानाही ते अचूक असतील यावर भर दिला. विविध राजकीय समालोचने लावताना समतोल राखला. यामुळेच “प्रभात’ने वृत्तपत्रसृष्टीमध्ये स्वत:चा मापदंड तयार केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)