कार्ला – पाण्याचे साठे स्वच्छ ठेवा डेंग्यू आजार पळवून लावा, “डासाचा डंख छोटा, पण देशाला आहे धोका मोठा’, अशा घोषणा देत कार्ला गावात प्रभात फेरी काढत राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला.

16 मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधत कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कार्ला गावात जनजागृती करण्यासाठी आरोग्य केंद्रातील शिकाऊ परिचारिकांच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली. या वेळी कार्ला आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. चव्हाण, डॉ. भारती पोळ, पल्लवी बेडाळे, चंद्रकांत गवलुवाड, शंकर हाके, राजु कावरा, नयन धांगडा, सुभाष गवळी, जयवंत गिंगाल, विकास वायकर, महेश हुलावळे, सोमनाथ हुलावळे, शुभम हुलावळे, गोविंद वायकर, बाबु शिंदे व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)