प्रभात प्रभाव : त्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता सुरू

सुनील राऊत 

पुणे : महापालिकेतील पिण्याचे पाणी साठविण्याच्या टाकीचे स्वच्छता करण्याचे काम भवन विभागाकडून आज तातडीने हाती घेण्यात आले. या टाकीवर काही कर्मचारी आंघोळ आणि कपडे धुवत असल्याने आयुक्तांपासून ते महापौरांपर्यंत आणि पालिकेच्या मुख्य इमारतीत दैनदिंन कामांसाठी आलेल्या नागरिकांपासून ते शिपायांपर्यंत पालिकेच्या मुख्य  इमारतीमध्ये आलेल्या प्रत्येक नागरिकाला चक्क आंघोळ आणि कपडे धुतलले पाणी प्यावे लागत असल्याची धक्कादायक बाब दैनिक प्रभातने ‘अधिकारी, कर्मचारी पितात आंघोळीचे पाणी ‘ या वृत्ताद्वारे उघडकीस आणली होती. त्याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ही टाकी तातडीनं स्वच्छ करण्याच्या सूचना भवन विभागास दिल्या होत्या. त्यानुसार हे काम सुरू करण्यात आलेले आहे.

ज्या पाण्याच्या टाकीतून मुख्य इमारतीला पाण्याचा पुरवठा केला जातो. त्या टाकीवरच नवीन इमारतीच्या सुरू असलेल्या कामावरील मजूर आंघोळी करत असून त्यावरच कपडेही धुवत आहेत. विशेष म्हणजे या पाण्याच्या टाकीच्या झाकणावरच हा प्रकार सुरू असल्याची छायाचित्रे दैनिक प्रभातच्या हाती लागली होती. आहेत. त्यामुळे पुणेकरांना कोटयावधी रूपये खर्चून स्वच्छ पाणी देण्याचा दावा करणारी महापालिका आपल्या कर्मचाऱ्यांना अशुद्ध पाणी देत असल्याचे या निमिताने समोर आले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)