प्रभात डेअरीचे दूध धंद्यासाठी मोठे योगदान (भाग एक)

 अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात दूध उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यामध्ये एच. एफ. जातीच्या गायी प्रामुख्याने आहेत. शेतकऱ्यांकडे दोन गायीपासून 50 ते 100 गायीपर्यंत गोठे आहेत. भारताचे माजी कृषिमंत्री स्व. अण्णासाहेब शिंदे यांच्या पुढाकाराने सन 1975 च्यादरम्यान परदेशी जातीच्या गायींची हजेरी लागली. सुरुवातीला या गायींपासून 30 ते 45 लि. प्रतिदिन दूध उत्पादन होत होते. सुरुवातीला शेतकऱ्यांचा उत्साह, नवीन जातीचे नावीन्य यामुळे हा व्यवसाय भरभराटीस आला. तथापि, यापुढील काळात या गायींची पैदास, व्यवस्थापन, आहार याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले गेले नाही. त्यामुळे सध्या या गायी केवळ 5 ते 10 लि. दूध देतात. याचे प्रमुख कारण या परदेशी गायींचे संगोपन, प्रशिक्षण आणि यासाठी आवश्‍यक पायाभूत सेवासुविधांचा अभाव होय. याच दरम्यान सहकारी दूध संस्थांनी यंत्रणा जर्जर होत गेली. छोटे-छोटे खासगी दूध सेंटर आणि चिलिंग सेंटर्स उदयास आले. त्यांच्याकडे असणाऱ्या अपुऱ्या आणि तोडक्‍या साधनसामुग्रीमुळे गायी संगोपनासाठी आवश्‍यक सेवासुविधा देणे अशक्‍य झाले.

प्रभात डेअरीची स्थापना 17 जुलै 1999 रोजी श्रीरामपूर तालुक्‍यातील रांजणखोल परिसरात झाली. व्यावसायिक चिकित्सा, चिकाटी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, सक्षम सेवकवर्ग आणि तत्पर ग्राहक सेवा यामुळे व्यवसाय वृध्दिंगत झाला. आज प्रभात डेअरीकडे प्रतिदिनी 10 लाख लि. दुधाची हाताळणी केली जाते. उद्यमशील व्यक्‍तिमत्त्व असलेले श्री. सारंगधर निर्मल हे या प्रकल्पाचे संस्थापक आहेत. विवेक निर्मळ हे कार्यकारी संचालक म्हणून समर्थपणे या कंपनीची धुरा सांभाळत आहेत.

दुधावर प्रक्रिया करून मुंबई आणि आजूबाजूच्या शहरात पिशवीतून ताजे दूध पुरवठा केले जाते आणि याचबरोबर शिल्लक दुधापासून दूध पावडर, तूप, सुगंधी दूध, यु.एच.टी दूध, चीज, श्रीखंड, पनीर, दही, लस्सी, डेअरी व्हाईटनर व ताक, आदी उपपदार्थ केले जातात. कंपनीने आयएसआय मार्क, ऍगमार्क इ. मानांकने घेतली आहेत. कंपनीकडे पावडर प्लॉट, तूप प्लॉट, अत्याधुनिक दूध प्रक्रिया यंत्रणा, दूध तपासणीसाठी प्रयोगशाळा, बल्क कुलर, चिलिंग सेंटर्स, इ. साधनसामुग्रीमुळे देशातील आणि परदेशातील नामांकित कंपन्या प्रभातसोबत व्यवसाय करण्यासाठी उत्सुक आहेत. उच्च गुणप्रतीचे, ताजे व निर्भेळ दूध संकलनातूनच विकास शक्‍य आहे.

प्रभातने यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. व्यवस्थापन व कर्मचारी यांच्या संयुक्‍त व अथक परिश्रमामुळेच मागील वर्षी प्रभात डेअरीला भारतीय उद्योग महासंघाने गुणवत्तेसाठीचे पारितोषिक देऊन गौरव केला आहे. विदेशात दूध पावडर व चीज यांची निर्यातही सुरू झाली आहे. तुर्भे एमआयडीसी, नवी मुंबई येथेही कंपनीने अत्याधुनिक दूध प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे.

भारत सरकारने नुकताच अन्नसुरक्षा कायदा अंमलात आणलेला आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी चालू आहे. दूध हे सार्वजनिक अन्न असल्याने त्याची दूधनिर्मितीपासून दूध संकलन प्रक्रिया, साठवणूक ते ग्राहक सेवा असा हा दुधाचा प्रवास अत्यंत नाजूकपणे शास्त्रीय पध्दतीने हाताळणे गरजेचे असते. ग्राहकांचे या विषयाचे प्रगत ज्ञान, कायदा, स्पर्धा आणि किफायतशीरपणा यासाठी कंपनीने एक विशेष मोहीम फेब्रुवारी 2010 पासून हाती घेतलेली आहे. यालाच “प्रभात डेअरी क्‍वालिटी मिशन’ असे संबोधले जाते. यामध्ये गावपातळीवरील एक तरुण होतकरू मुलांची निवड केली जाते. या जागेमध्ये अंदाजे 2 लाख रुपयांची संगणकीकृत स्वयंचलित दूध संकलन यंत्रणा लावली जाते.

 किशोर निर्मळ

 संचालक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)