प्रभात डेअरीचे दूध धंद्यासाठी मोठे योगदान (भाग चार )

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात दूध उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यामध्ये एच. एफ. जातीच्या गायी प्रामुख्याने आहेत. शेतकऱ्यांकडे दोन गायीपासून 50 ते 100 गायीपर्यंत गोठे आहेत. भारताचे माजी कृषिमंत्री स्व. अण्णासाहेब शिंदे यांच्या पुढाकाराने सन 1975 च्यादरम्यान परदेशी जातीच्या गायींची हजेरी लागली. सुरुवातीला या गायींपासून 30 ते 45 लि. प्रतिदिन दूध उत्पादन होत होते. सुरुवातीला शेतकऱ्यांचा उत्साह, नवीन जातीचे नावीन्य यामुळे हा व्यवसाय भरभराटीस आला. तथापि, यापुढील काळात या गायींची पैदास, व्यवस्थापन, आहार याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले गेले नाही. त्यामुळे सध्या या गायी केवळ 5 ते 10 लि. दूध देतात. याचे प्रमुख कारण या परदेशी गायींचे संगोपन, प्रशिक्षण आणि यासाठी आवश्‍यक पायाभूत सेवासुविधांचा अभाव होय. याच दरम्यान सहकारी दूध संस्थांनी यंत्रणा जर्जर होत गेली. छोटे-छोटे खासगी दूध सेंटर आणि चिलिंग सेंटर्स उदयास आले. त्यांच्याकडे असणाऱ्या अपुऱ्या आणि तोडक्‍या साधनसामुग्रीमुळे गायी संगोपनासाठी आवश्‍यक सेवासुविधा देणे अशक्‍य झाले.

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात दूध उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यामध्ये एच. एफ. जातीच्या गायी प्रामुख्याने आहेत. शेतकऱ्यांकडे दोन गायीपासून 50 ते 100 गायीपर्यंत गोठे आहेत. भारताचे माजी कृषिमंत्री स्व. अण्णासाहेब शिंदे यांच्या पुढाकाराने सन 1975 च्यादरम्यान परदेशी जातीच्या गायींची हजेरी लागली. सुरुवातीला या गायींपासून 30 ते 45 लि. प्रतिदिन दूध उत्पादन होत होते. सुरुवातीला शेतकऱ्यांचा उत्साह, नवीन जातीचे नावीन्य यामुळे हा व्यवसाय भरभराटीस आला.

तथापि, यापुढील काळात या गायींची पैदास, व्यवस्थापन, आहार याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले गेले नाही. त्यामुळे सध्या या गायी केवळ 5 ते 10 लि. दूध देतात. याचे प्रमुख कारण या परदेशी गायींचे संगोपन, प्रशिक्षण आणि यासाठी आवश्‍यक पायाभूत सेवासुविधांचा अभाव होय. याच दरम्यान सहकारी दूध संस्थांनी यंत्रणा जर्जर होत गेली. छोटे-छोटे खासगी दूध सेंटर आणि चिलिंग सेंटर्स उदयास आले. त्यांच्याकडे असणाऱ्या अपुऱ्या आणि तोडक्‍या साधनसामुग्रीमुळे गायी संगोपनासाठी आवश्‍यक सेवासुविधा देणे अशक्‍य झाले.

किशोर निर्मळ

संचालक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)