प्रभात डेअरीचे दूध धंद्यासाठी मोठे योगदान (भाग तीन)

 अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात दूध उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यामध्ये एच. एफ. जातीच्या गायी प्रामुख्याने आहेत. शेतकऱ्यांकडे दोन गायीपासून 50 ते 100 गायीपर्यंत गोठे आहेत. भारताचे माजी कृषिमंत्री स्व. अण्णासाहेब शिंदे यांच्या पुढाकाराने सन 1975 च्यादरम्यान परदेशी जातीच्या गायींची हजेरी लागली. सुरुवातीला या गायींपासून 30 ते 45 लि. प्रतिदिन दूध उत्पादन होत होते. सुरुवातीला शेतकऱ्यांचा उत्साह, नवीन जातीचे नावीन्य यामुळे हा व्यवसाय भरभराटीस आला. तथापि, यापुढील काळात या गायींची पैदास, व्यवस्थापन, आहार याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले गेले नाही. त्यामुळे सध्या या गायी केवळ 5 ते 10 लि. दूध देतात. याचे प्रमुख कारण या परदेशी गायींचे संगोपन, प्रशिक्षण आणि यासाठी आवश्‍यक पायाभूत सेवासुविधांचा अभाव होय. याच दरम्यान सहकारी दूध संस्थांनी यंत्रणा जर्जर होत गेली. छोटे-छोटे खासगी दूध सेंटर आणि चिलिंग सेंटर्स उदयास आले. त्यांच्याकडे असणाऱ्या अपुऱ्या आणि तोडक्‍या साधनसामुग्रीमुळे गायी संगोपनासाठी आवश्‍यक सेवासुविधा देणे अशक्‍य झाले.

सर्वसाधारणपणे शासन किंवा दूध विकत घेणारी संस्था यांच्याकडून होणे क्रमप्राप्त असते. अर्थात, यासाठी तांत्रिक कौशल्य असणारे मनुष्यबळ, मोठी गुंतवणूक, यंत्रणा राबविण्याची कार्यप्रणाली या बाबी महत्त्वाच्या असतात. प्रभात डेअरी क्‍वालिटी मिशन अंतर्गत शेतकऱ्यांचे दूध खरेदी आणि त्या योग्यतेची समाधानाची भूमिका पाहून प्रभात डेअरीने वरील सर्व बाबींचा सखोल व सांगोपांग अभ्यास करून “प्रभात संजीवन योजना’ हाती घेण्याचे योजले आहे. यासाठी पदवीधर पशुवैद्यकीय अधिकारी, पदवीधारक, प्रभात पशुमित्र, प्रभात सेंटरवरील प्रभातमित्र, वैरण विकास अधिकारी, महिला प्रशिक्षिका, केमिस्ट, इ. प्रशिक्षित मनुष्यबळ उभे केलेले आहे.

यांच्यामार्फत जनावरांचे आरोग्य, उपचार, शास्त्रीय पशुपैदासकरिता सिध्द वळूचे (प्रोझनी टेस्टेड) वीर्य (बीएफ, पुणे) प्रभात पशू आहार, मिनरल मिक्‍श्चर, सुधारित वैरण, बी-बियाणे, नामांकित कंपनीचे औषधे, साथीच्या रोगापासून संरक्षण होण्यासाठी लसीकरण, सामूहिक जंतनिर्मूलन, सामूहिक गोचिड निर्मूलन, मुक्‍तसंचार गोठे यासाठी प्रभातच्या माध्यमातून बॅंकेमार्फत अर्थसहायक, कमी मजुरात जास्तीत जास्त दूधउत्पादन होण्यासाठी मिलिंकग मशिन, चाफ कटर, ग्रासकटर इ. यंत्रसामुग्री या सर्व बाबींचा योग्य वापर होण्यासाठी शेतकरी व महिला यांचे नियमितपणे शिक्षण, प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. यामध्ये तज्ज्ञ अधिकाऱ्यांमार्फत गोठ्यावर भेटी देऊन मार्गदर्शन, सल्ला, प्रशिक्षण त्याचबरोबर समूहामध्ये परिसंवाद, प्रभात डेअरीमध्ये 1 ते 3 दिवसांचे प्रशिक्षण वर्ग, मेळावे, शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून कार्यक्षमता आणण्याचे अविरतपणे चालू असते. म्हणून या उपक्रमास “प्रभात संजीवन योजना’ असे संबोधले जाते.

प्रभात डेअरीचे दूध धंद्यासाठी मोठे योगदान (भाग दोन )

यासोबतच प्रभात दूध संकलन केंद्र असलेल्या 500 गावांमध्ये प्रभात पशुमित्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृत्रिम रेतन सेवा योजनेचा शुभारंभही झालेला आहे. त्यासाठी 40 पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना कंटेनर, नायट्रोजन व सिमेन डोसेसचे वाटप करण्यात आले आहे. एकूण 45 केंद्रांद्वारे कृत्रिम रेतन सेवा पुरविण्यात येत आहे. नजीकच्या भविष्यकाळात इतर दूध व्यावसायिकांच्या सहकार्याने कार्यक्षम माध्यमातून गोसंवर्धन, विविध विस्तार सेवा, प्रशिक्षण याद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दूध व्यवसायाकडे कल वाढून तो किफायतशीर कसा होईल याकडे लक्ष देण्याचा प्रभातचा मानस आहे. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील दूधउत्पादकांचे नेतृत्व करणाऱ्या प्रभात डेअरीला या कामाचा बहुमोल वाटा उचलण्यास व दूध व्यवसायाला निरंतर योगदान देण्यास नक्‍कीच आनंद होईल.

किशोर निर्मळ

संचालक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)