प्रभात डेअरीचे दूध धंद्यासाठी मोठे योगदान (भाग दोन )

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात दूध उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यामध्ये एच. एफ. जातीच्या गायी प्रामुख्याने आहेत. शेतकऱ्यांकडे दोन गायीपासून 50 ते 100 गायीपर्यंत गोठे आहेत. भारताचे माजी कृषिमंत्री स्व. अण्णासाहेब शिंदे यांच्या पुढाकाराने सन 1975 च्यादरम्यान परदेशी जातीच्या गायींची हजेरी लागली. सुरुवातीला या गायींपासून 30 ते 45 लि. प्रतिदिन दूध उत्पादन होत होते. सुरुवातीला शेतकऱ्यांचा उत्साह, नवीन जातीचे नावीन्य यामुळे हा व्यवसाय भरभराटीस आला. तथापि, यापुढील काळात या गायींची पैदास, व्यवस्थापन, आहार याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले गेले नाही. त्यामुळे सध्या या गायी केवळ 5 ते 10 लि. दूध देतात. याचे प्रमुख कारण या परदेशी गायींचे संगोपन, प्रशिक्षण आणि यासाठी आवश्‍यक पायाभूत सेवासुविधांचा अभाव होय. याच दरम्यान सहकारी दूध संस्थांनी यंत्रणा जर्जर होत गेली. छोटे-छोटे खासगी दूध सेंटर आणि चिलिंग सेंटर्स उदयास आले. त्यांच्याकडे असणाऱ्या अपुऱ्या आणि तोडक्‍या साधनसामुग्रीमुळे गायी संगोपनासाठी आवश्‍यक सेवासुविधा देणे अशक्‍य झाले.

प्रभात मित्राला सदरची यंत्रणा चालविण्याकरिता साधारण दोन आठवड्याचे प्रशिक्षण दिले जाते. अशा या प्रभात दूध संकलन केंद्रामध्ये थेट शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी केली जाते. म्हणजेच शेतकरी प्रभात दूध संकलन केंद्रावरती दूध घेऊन आल्यानंतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजन काट्यावरती त्यांचे वजन त्यांच्यासमोर केले जाते. सॅम्पल दुधाची मिल्क  अनालायझरवरती शेतकऱ्यांसमोर तपासणी होते. यामुळे शेतकऱ्यांची शंका राहत नाही. या सर्व गोष्टी समाविष्ट असल्यामुळे दूध खरेदीची पावती ताबडतोब दिली जाते. त्यामुळे संपूर्ण दूध स्वीकृतीमध्ये पारदर्शकता असल्याने दूध विक्रीचे शेतकऱ्यांना पूर्ण समाधान मिळते. याबाबत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्‍या आहेत.

प्रभात डेअरीचे दूध धंद्यासाठी मोठे योगदान (भाग एक)

म्हणजेच दुधाला दर चांगला मिळतो, वेळेत पेमेंट होते, दिवाणी सणासाठी रिबेट मिळते, पशुखाद्य, मिनरल मिक्‍शर, इ. सेवासुविधा मिळतात. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताणतणाव कमी होतो. जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहाता, राहुरी, नेवासा, कोपरगाव, संगमनेर, शेवगाव, पाथर्डी व औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या 9 तालुक्‍यांत अशी 500 हून अधिक गावांमध्ये प्रभात दूध संकलन केंद्र कार्यान्वित आहेत. पन्नास हजारपेक्षा जास्त दूधउत्पादकांकडून थेट दूध स्वीकृती होत आहे. अनेक गावातून होतकरू तरुण प्रभात सेंटरची मागणी करीत आहेत. याशिवाय 200 बल्क मिल्क कुलर्सद्वारे उत्तम गुणप्रतीचे दुधाचे संकलन होत आहे. अहमदनगर जिल्ह्याबरोबरच नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये दूध संकलन व शीतकरण केले जात आहे.

दुग्धव्यवसाय किफायतशीर होण्यासाठी, त्यात सातत्य राहण्यासाठी, व्यवसाय वृध्दिंगत होण्यासाठी शास्त्रीय पध्दतीचा अवलंब ही दुग्धव्यवसायाची मूलभूत गरज असते. ही करणेसाठी सर्व प्रथम शेतकरी आणि गाय संगोपन करणारांचे कुटुंबातील सदस्य यांचे ज्ञान, कौशल्य, उत्साह, व्यवसाय चिकित्सा, इ. बाबी सर्वप्रथम महत्त्वाच्या असतात. यासाठी या व्यवसायाची प्राथमिक माहिती, ज्ञान आणि प्रशिक्षण अत्यंत गरजेचे असते. असे शिक्षण प्रशिक्षण देणे ही शासन, कृषी विद्यापीठे, डेअरी उद्योग यांची जबाबदारी असते. त्याचबरोबर अशा प्रशिक्षकांना शेतकऱ्यांनी पूर्णवेळ देणे, उपस्थिती राहणे, स्वत:ला झोकून देऊन यामध्ये भाग घेणे ही त्या संबंधित शेतकऱ्यांची कर्तव्ये व जबाबदारी असते. यातून दुभत्या गायी, गाभण गायी, वासरे यांचे संगोपन, आहार, आरोग्य, पैदास, इ. बाबतीत उपलब्ध साधन सामुग्रीचा सुयोग्य वापर करण्याची क्षमता येते. यासाठी आवश्‍यक सेवासुविधा वेळेत उपलब्ध होणे ही महत्त्वाची व काळाची गरज असते.

किशोर निर्मळ

संचालक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)