प्रभात’च्या दणक्‍याने बीएसएनएल सेवा सुरळीत

कवठे, दि. 13 (वार्ताहर) –
सुरुरसह परिसरातील बीएसएनएल सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद झाली होती. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिक संपर्कहीन झाले होते. याबाबत “दैनिक प्रभात’ने सडेतोड वृत्तांकन करताच बुधवारी तातडीने बीएसएनएलच्या व्यवस्थापनाने ही सेवा सुरळीत करुन दिली आहे. त्यामुळे परिसरातून “प्रभात’चे आभार मानले जात आहेत.
सुरुरसह कवठे परिसरातील फोन सेवा 2 जून पासून बंद झाली होती. यामध्ये सदर विभागाने तातडीने शोध घेवून सेवा पूर्ववत करणे अपेक्षित होते. परंतु शेतामध्ये चारी खोदल्याने व त्यामध्ये पाणी साठले असल्याने सदर कामाबाबत दिरंगाई लागत होती. यामध्ये 11 दिवस सदर सेवा बंदच राहिली होती. त्यामुळे परिसरातील जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. जनतेची गैरसोय लक्षात घेऊन बीएसएनएलच्या कारभाराबाबत दैनिक प्रभात मंगळवार, 12 रोजीच्या अंकात सडेतोड वृत्त लिहिले होते. ही बातमी प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या बीएसएनलच्या व्यवस्थापनाने बुधवारी तात्काळ दुरुस्ती करुन सेवा पूर्ववत केली आहे.
दरम्यान, ही सेवा बंद असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत व या परिसरातील संगणक संस्था व खाजगी ग्राहक जे ऑनलाईन सेवा सुविधा वापरतात, अशा सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. सेवा सुरळीत झाल्याने बी.एस.एन.एल ग्राहकांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. कवठे परिसरातील बी.एस.एन.एल. ग्राहकांनी दैनिक प्रभातने बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल व त्यामध्ये ग्राहकांची बाजू मांडल्याबद्दल दैनिक प्रभातचे अभिनंदन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)