“प्रभात’च्या दणक्‍याने पुणे-नगर महार्गाची कोंडी फुटली

शिक्रापूर पोलीस खडबडून जागे : कोंडी फोडण्यासाठी उतरले महामार्गावर

शिक्रापूर- “शिक्रापुरात वाहतूक सुरक्षा सप्ताहातच वाहनांच्या रांगा’ या मतळ्याखाली दै. “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शिक्रापूर पोलीस खडबडून जागे झाले अन्‌ कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरले असून 54 बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून 11 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण चौक व पाबळ चौक या ठिकाणी नेहमीच चर्चेत असून त्या ठिकाणी बेशिस्त वाहनचालक, बेशिस्त पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहतूक यामुळे ही वारंवार वाहतूककोंडी होत असते ही कोंडी सोडविण्यासाठी शिक्रापूर-चाकण चौकात सिग्नल बसविण्यात आले होते, त्यांनतर काही दिवसांनी येथील सिग्नल बंद पडले होते. सध्या शिक्रापूर पोलिसांनी वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरु केला;परंतु त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कोंडी होऊन वाहनांच्या लांबचलांब रांगा लागू लागल्या याबाबतचे दै.”प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल पोलिसांनी घेत आज (गुरुवारी) बेशिस्त वाहनांवर व वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. यात पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, आप्पासाहेब सूर्यवंशी, ज्ञानेश्‍वर शेवरे, ज्ञानदेव गोरे, विशाल कोठालकर, विनायक नागरगोजे, हेमंत इनामे, सुरेश डुकले यांनी करवाईत सहभाग घेतला.
बेशिस्त वाहनांबरोबरच विनापरवाना, ट्रिपल सिट, बिगर नंबर, शाळा व महाविद्यालये या ठिकाणी गिरक्‍या मारत असणाऱ्या या वाहनांवर देखील कारवाई करण्याची मोहीम शिक्रापूर पोलीस राबविणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, या कारवाई मोहिमेचा वाहनचालकांनी देखील चांगलाच धसका घेतला असून परिसरातून या कारवाईचे स्वागत होत आहेत. तर दररोज अशा पद्धतीच्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून वाहनचालकांना शिस्त लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये प्रत्येक ठिकाणी रस्त्यांवर विरुद्ध दिशेने वाहतूक, बेशिस्त वाहनचालक, बेशिस्त पार्किंग यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे व त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत तसेच शाळा व महाविद्यालयीन मुला मुलींना जाण्यासाठी त्याचा त्रास होत असतो. सध्या सुरु असलेली कारवाई ही यापुढे देखील अशीच सुरू ठेवणार असून या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना शिस्त लावणार आहे.
    – सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)