‘प्रभात’चा वर्धापन दिन थाटात

मान्यवरांची मांदियाळी : पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव

पिंपरी – नववर्षाची प्रथम सायंकाळ, उत्साहाचे भरते अशा मंगलमय वातावरणात दैनिक “प्रभात’ पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. दैनिक “प्रभात’ ला शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांची आणि वाचकांची मांदियाळी चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरमध्ये जमली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील असंख्य वाचकांच्या शुभेच्छांची शिदोरी घेत दैनिक “प्रभात’ने 89 व्या वर्षांत पदार्पण केले. ध्येयनिष्ठ, व्यासंगी आणि विवेकी पत्रकारितेची कास धरत गेल्या 88 वर्षांपासून दैनिक “प्रभात’ने समाजोन्नतीचा वसा घेतला आहे. चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरमध्ये दैनिक ‘प्रभात’ पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयाच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भव्य कमान, रांगोळ्या आणि दैनिक प्रभात’वर मनापासून प्रेम करणाऱ्या वाचकांनी आणि हितचिंतकांनी ऑटो क्‍लस्टरचे सभागृह आणि प्रांगण गर्दीने अक्षरशः फुलून गेले होते. सर्व राजकीय पक्षांचे, सामाजिक संस्था, उद्योग, शिक्षण अशा सर्व क्षेत्रांचे मान्यवर एकाच वेळी एकाच ठिकाणी येण्याचा दुर्मिळ योग दैनिक “प्रभात’च्या वर्धापन दिनाने जुळवून आणला होता. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला हा स्नेह आणि शुभेच्छांचा सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

सोहळ्याची सुरुवात दैनिक “प्रभात’चे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी यांच्या मुख्य उपस्थितीत शहर पोलीस आयुक्‍त आर.के.पद्‌मनाभन, महामेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे, उद्योजक विनोद बन्सल, सामाजिक कार्यकर्ते पै.सचिन पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, पी.के.इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ काटे, माजी शिक्षण सभापती धनंजय भालेकर, श्री शिवछत्रपती शिवाजी राजे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अण्णा जाधव, नगरसेविका झामाताई बारणे, सामाजिक कार्यकर्ते तात्या भालेकर, दैनिक प्रभातचे कार्यकारी संपादक अविनाश भट, पिंपरी-चिंचवड कार्यालय प्रमुख शिरीष समुद्र, दैनिक “प्रभात’चे महाव्यवस्थापक बी.एल.स्वामी व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाली.

दैनिक “प्रभात’ ला शुभेच्छा देण्यासाठी शहराचे महापौर राहुल जाधव, आयुक्‍त श्रावण हर्डीकर, उपमहापौर सचिन चिंचवडे, सत्ताधारी पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, स्थायी समिती सदस्य विलास मडीगेरी, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, स्वीकृत नगरसेवक भाऊसाहेब भोईर, शिक्षण समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, शाहू शिक्षण संस्थचे संचालक अजय साळुंखे व संचालिका कोमल साळुंखे, अॅड. गोरक्षनाथ झोळ, आरपीआय उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम, पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडूसकर, वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव, पीएमपी मुख्य समन्वयक संतोष माने, वल्लभनगर एसटी आगारप्रमुख संजय भोसले आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)