प्रभाग 12 अ मध्ये सरळ लढत होणार

नगर: महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक- 12 अ’ मधून शिवसेना व भाजपच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व रासपच्या उमेदवारात सरळसरळ लढत होणार आहे. निवडणुकीतील स्पर्धा कमी झाल्याने या प्रभागात रासपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

प्रभाग 12- अ मधून शिवसेनेचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांच्या अर्जावर घुले यांनी आक्षेप घेतला. बोराटे यांचा अर्ज बाद झाला. याच प्रभागातील भाजपाचे उमदेवार सुरेश खरपुडे त्यांचाही अर्ज बाद झाला. या प्रभागात रिंगणात आता रासपचे हरिभाऊ डोळसे आणि राष्ट्रवादीचे संजय घुले यांच्यात लढत आहे. त्यामुळे आता रासपच्या आशा वाढल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)