प्रभाग रचनेबाबतचे शासनाचे धोरण विसंगत- अनिल राठोड

 शहर विकासावर होणार दुरगामी परिणाम

नगर: शहराची प्रभागरचना करताना तिला आम्ही विरोध केला होता. पण शासनाचे धोरणच विचित्र आहे. याचा परीणाम शहर विकासावर होणार आहे. मात्र शिवसेना याबाबत सतत संघर्ष करेल व जनतेला न्याय मिळवून देईल, असे प्रतिपादन माजी आमदार अनिल राठोड यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महिला व बालकल्याण विभागाच्या माजी उपसभापती व माजी नगरसेविका कलावती शेळके यांच्या पुढाकाराने सिव्हिल हडको वसाहतीतील जय तुळजाभवानी मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉल बसविण्यात आले. या कामाच्या लोकार्पण सोहळ्यात राठोड बोलत होते. जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव, कलावती शेळके, चंद्रकांत शेळके व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मनोहर गोसावी, मुळे, सारडा, डागवाले, कीर्तने, मंदिराचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा मंदिर परिसरातील रहिवासी गौतम मुथा आदी उपस्थित होते.

राठोड म्हणाले, नव्या प्रभाग रचनेत प्रभाग अत्यंत मोठे झाले आहेत. त्यामुळे प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. याचाच परीणाम परिसरातील समस्या सोडविण्यावर व परिणामी शहर विकासावर होणार आहे. शिवसेना हा या निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. सोयऱ्या-धायऱ्यांचे राजकारण असलेले इतर सर्व पक्ष आहेत. एकमेव शिवसेना समाजकारणाच्या जिवावर हे यश संपादू शकला आहे. याच पार्श्‍वभूमीवर आम्ही परिसरातील नागरिकांच्या भावनांचा निश्‍चित आदर करु. याप्रसंगी प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन गुगळे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)