प्रभाग एकमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करावी : राजगुरू

पाथर्डी: शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांसाठी पाईपलाईन टाकून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी नगरसेवक प्रवीण राजगुरू यांनी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे व मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत नगराध्यक्ष गर्जे व मुख्याधिकारी कोळेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक एकमध्ये शेवगाव रस्त्यालगत असलेल्या रासकर वस्ती ते शिरसाठ वस्ती त्याचबरोबर वामनभाऊ नगरमधील चोरडीया घर ते भताने घर, अर्जुन बाबा मंदिरामागील कॉलनीमध्ये तसेच वामनभाऊ नगर मधील दौंड घर ते मार्केट कमिटी भिंत दरम्यान नगरपालिकेने पाईपलाईन टाकली नसल्याने पाणीपुरवठा होत नाही, यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
या परिसरात पालिकेने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकून लवकरात लवकर पाणीपुरवठा करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)