प्रभागांचे होणार स्वच्छता “रेटिंग’

स्वच्छ मोहिमेअंतर्गत पालिकेकडून प्रभागांचे सर्वेक्षण सुरू

पुणे – महापालिकेकडून शहरात सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-2019 मोहिमेअंतर्गत शहरातील प्रभागांचे स्वच्छता “रेटिंग’ निश्‍चित केले जाणार आहे. त्यात स्वच्छ प्रभाग, मध्यम स्वच्छ प्रभाग व अस्वच्छ प्रभाग असा प्रभागांचा क्रम ठरविला जाणार आहे.

देशातील पहिल्या क्रमांकाचे राहण्यायोग्य शहर म्हणून महापालिकेस नुकतेच केंद्र शासनाने गौरविले आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत अजूनही महापालिकेस स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या 10 क्रमांकात स्थान मिळविता आलेले नाही. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी महापालिका प्रशासनाने सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून पुणे शहराचे मानांकन वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अंतर्गत पालिका प्रशासनाकडून शहरातील 41 प्रभागांमध्ये दररोज सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत स्वच्छता सर्वेक्षण तसेच प्रभागाची पाहणी केली जाते. त्या अंतर्गत महापालिकेच्या पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक तसेच पालिकेचे अधिकारी प्रभागांमध्ये स्वत: फिरुन स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतात. डिसेंबरअखेर 41 प्रभागांमध्ये अशा सुमारे 1,740 ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहेत. यातून समोर आलेल्या माहितीच्या आधारावर प्रत्येक प्रभागातील कचऱ्याची स्थिती, राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग, लोकप्रतिनिधींचा सहभाग अशा घटकांची पाहणी करून त्याचा अंतिम अहवाल तयार केला जात आहे.

तीन गटात प्रभागांचे “रेटिंग’
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तीन गटांमध्ये प्रभागांचे “रेटिंग’ केले जाणार आहे. त्यात, 75 ते 100 टक्‍क्‍यांपर्यंत स्वच्छ असलेल्या प्रभागास “ग्रीन रेटिंग’, 50 ते 75 टक्के स्वच्छ असलेल्या प्रभागास “यलो रेटिंग’ तर 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी स्वच्छ असलेल्या प्रभागाला “रेड रेटिंग’ दिले जाणार आहे. यामुळे कोणत्या प्रभागात आणखी स्वच्छतेची गरज आहे, ही बाब लक्षात येणार असून त्यानुसार संबंधित प्रभागातील घनकचरा व्यवस्थापनाची दिशा ठरविली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)