प्रभागनिहाय अपक्षांच्या विकास आघाड्या ; राजकीय पक्षाच्या उमेदवारांना ठरणार डोकेदुखी

राजकीय पक्षाच्या उमेदवारांना डोकेदुखी ठरणार : विरोधकांडून अपक्षांना “रसद’ 

नगर: महापालिका निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची चित्र स्पष्ट झाले आहे. राजकारणात जिंकण्यासाठी सर्वकाही हा फंडा सर्वश्रूत आहे. त्यानुसार अपक्षांनी एकत्र येत प्रभागनिहाय विकास आघाड्या सुरू केल्या आहेत. या आघाड्यांना राजकीय पक्षातंर्गत असलेला कलहातून छुपी “रसद’ देखील मिळत आहे. हा राजकीय खेळ महापालिकेत वेळप्रसंगी वेगळे चित्र निर्माण करू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

शिवसेना, भारतीय जनता पक्षा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्षांनी महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवार निश्‍चित केले आहे. महापालिकेची प्रभाग रचना पाहिल्यास यावेळी नवीन रचनेनुसार 17 प्रभाग झाले आहे. प्रत्येक प्रभागातून चार उमेदवार निवडून द्यायचे आहे. या हिशोबाने राजकीय पक्षांनी प्रत्येक प्रभागात चार उमेदवार दिले आहेत. उमेदवारी निश्‍चित करताना राजकीय पक्षांना तारेवरची कसरत करावी लागली होती.

भारतीय जनता पक्षाने राजकीय खेळी करत केडगाव उपनगरातील कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवकांना खेचून घेतले. यावरून महापालिकेच्या राजकारणात रंगत निर्माण झाली आहे. यावरून भाजप-राष्ट्रवादीची छुपी युती असल्याची चर्चा होऊ लागली आहे. ही चर्चा कोणापासून लपलेली नाही. या युतीमागे कॉंग्रेसचा देखील हात असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनाला रोखण्यासाठी हा सर्व राजकीय खटाटोप असल्याचे सांगितले जाते आहे.

चर्चा काही असो, आजच्या अर्ज छाननीनंतर उमेदवारी पक्की झाली आहे. त्यामुळे प्रचाराला उमेदवारांनी वेग घेतला आहे. राजकीय गणिती जुळविण्यासाठी मतदारांच्या गाठीभेट घेत सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची उंबरठे झिजविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. निवडून येण्यासाठी सर्व काही हाच उमेदवारांनी अजेंठा ठेवला आहे. त्यासाठी विरोधकांशी हातमिळवणी करण्याची तयारी सुरू केल्या आहेत. यात विजयापेक्षा पाडापाडीच्या राजकारणाला वेग आला आहे. त्यासाठी बेरीज-वजाबाकीचे सूत्र आखली जात आहेत. ती यशस्वी होण्यासाठी भागाकार आणि गुणाकार देखील केला जात आहे. विरोधाला विरोध असेच काहीसे सध्याचा नगरमधील राजकीय वातावरण आहे.

प्रभागनिहाय राजकीय पक्षांना नामोहरम करण्यासाठी अपक्षांनी विकास आघाड्यांचा फंडा पुढे केला आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांची हीच डोकेदुखी ठरत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी या अपक्षांना वेगळ्याच गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्याचा इलाज राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सुरू केला आहे. या अपक्षांच्या विकास आघाड्यांना राजकीय पक्षांकडून देखील “रसद’ मिळत आहे. यामागे पाडापाडीचे राजकारण आहे. हे राजकारण यशस्वी झाल्यास महापालिकेत वेगळेच चित्र पाहयला मिळेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या राजकारणात राजकीय उमेदवारांपेक्षा अपक्ष विकास आघाड्या प्रबळ ठरू शकतात.

खुर्चीसाठी मतदारांना विसरू नका! 

पाडापाडीचे राजकारणात आर्थिक गोष्टींवर मोठी उलाढाल होते. महापालिका निवडणूक सध्या सोधा राजकारण पॅटर्न सुरू आहे. या पॅटर्नमध्ये मतदारांचा आणि त्यांच्यासाठी शहराचा आवश्‍यक असलेल्या मूलभूत सोयींचा विकासाचा विसर राजकीय पक्षांना पडलेला दिसतो आहे. मतदारांना विसरणार असाल, तर खुर्चीसाठी केलेल्या राजकारणाचा उपयोग महत्त्वाचा ठरणार नाही, असे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)