प्रभाकरराव भोर विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

संगमनेर – तालुक्‍यातील आंबीखालसा येथील प्रभाकरराव भोर विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 5 वी ते 10 वीतील विद्यार्थ्यांनी वैयक्‍तिक नृत्य, समूह नृत्य, नाटिका सादर केल्या. यावेळी शरयू देशमुख आणि चंद्रकांत कडलग यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश कान्होरे, तान्हाजी मुंढे, सरपंच अरुणा भुजबळ, पोलीस निरीक्षक दिलीप निघोट, अरुण वाघ, रमेश आहेर, कार्तिक तांगडकर, तुळशीराम भोर, कहाणे गुरुजी, तुकाराम कसबे, श्रीधर कहाणे, रामप्रसाद चांदघोडे, सौदामिनी कान्होरे, महेमूद सय्यद, राहुल कान्होरे, मिलिंद थोरात, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब भोर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, नानासाहेब भोर, प्रताप आहेर, विलास गायकवाड, बनसोडे, दिलीप गोडे, बबन तांगडकर, आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)