प्रफुल मेहता आणि ओम लमकाने बुध्दीबळ स्पर्धेचे विजेते

सातारा ः यशस्वी खेळाडूंसमवेत डॉ. रविंद्र झुटिंग आणि प्रणव सर.

सातारा, दि. 17 (प्रतिनिधी) – सातारा नगर परिषदेचे छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, शिर्के पटांगण गुरुवार पेठ, सातारा येथे थ्री- टू- वन चेस ऍकॅडॅमी सातारने आयोजित केलेल्या 7 व्या जलदगती बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सुरतचे प्रफुल मेहता आणि पुण्याचा ओम लमकाने यांनी अनुक्रमे खुला गट अजिंक्‍यपद व 19 वर्षाखालील ज्युनिअर गट अजिंक्‍यपद अपराजित राहून निर्विवाद वर्चस्व राखत जिंकले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सुरत, परभणी, वाई, कराड, सातारा, पुणे, कोल्हापुर, सांगली, मिरज, इंचलकरंजी, जेजुरी, इस्लामपूर येथून एकूण 106 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला.यामध्ये 6 ते 70 वर्षापर्यंतच्या खेळाडुंसह 50 आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ नगरसेविका श्रीमती अनिता घोरपडे, माजी नगरसेवक डॉ. रविंद्र भारती (झुटिंग) आणि स्पर्धा संयोजक थ्री टू वन चे प्रणव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मुख्य पंच म्हणून राष्ट्रीय पंच प्रणव टंगसाळे आणि राज्य पंच सौ.सारिका साबळे, सौ. पुनम जाधव, सौ. मनिषा जाधव, उद्धव पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी थ्री- टू- वन चेस ऍकॅडमीच्या आणि सातारा चेस फॅन क्‍लबच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच माजी नगराध्यक्षा सौ.सुजाता राजेमहाडीक आणि सातारा डिस्ट्रिक्‍ट चेस असोसिएशन यांचे विशेष सहकार्य मिळाले. ऍड.विनोद घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेतील गटनिहाय विजेते खालील प्रमाणे : खुला गट: प्रफुल मेहता (सुरत) 6.5 गुण – बक्षिस रु.3000 व चषक, ओंकार कडव (सातारा) 6 गुण – बक्षिस रु.2000 व चषक, रविंद्र निकम (इंचलकरंजी) 5 गुण – बक्षिस रु.1100 व चषक, मंगेश चोरगे (वाई) 5 गुण – बक्षिस रु.700, ऋषिकेश भिलारे (सातारा) 5 गुण- बक्षिस रु.500, केवल निर्गुण (पुणे) 4.5 गुण- बक्षिस रु.400,
सोहम चाळके (कोल्हापुर) 4.5 गुण- बक्षिस रु.400, रोहित मोकाशी (सांगली) 4.5 गुण बक्षिस रु.400, मुद्दसर पटेल (मिरज) 4 गुण- बक्षिस रु.400, कुणाल शिंदे (पुणे) 4 गुण- बक्षिस रु.400.
सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू – उदय सहस्त्रबुद्धे (पुणे) 4.5 गुण, बक्षिस-रु.401 व चषक, सर्वोत्कृष्ट महिला खेळाडु – कु.गायत्री जाधव (सातारा), 3 गुण, बक्षिस – रु.401 व चषक,
सर्वोत्कृष्ट अनरेटेड खेळाडु – पराग बनसोडे (पुणे) 3.5 गुण, बक्षिस – रु.401 व चषक.
19 वर्षाखालील ज्युनिअर गट: ओम लमकाने (पुणे) 6.5 गुण,बक्षिस- रु.1000 व चषक, श्रीराज भोसले (रेंदाल) 6 गुण, बक्षिस – रु.700 व चषक, वेद मोने (पुणे), 6 गुण, बक्षिस- रु.500 व चषक.
7 वर्षाखालील : शांभवी देशपांडे (कोल्हापुर), श्रीयश रणदिवे (सातारा), अर्णव कातीवले (सातारा).
9 वर्षाखालील : ध्रुव गांधी (सातारा), वरद फाळके (सातारा), चैत्राली जाधव (सातारा)
11 वर्षाखालील : अनिष असनारे (कोल्हापुर), कौस्तुभ साबळे (जेजुरी), अथर्व ढाणे(सातारा).
13 वर्षाखालील : ज्योतिरादित्य जाधव (सातारा), ओंकार पाटील (सातारा), आयुष शिंगटे (खडकी).
15 वर्षाखालील : सत्यम अंबि (मिरज), प्रेम म्हेत्रे (पुणे), मिताली यादव (सातारा).
सर्वोत्कृष्ट युवती खेळाडु – तृप्ती प्रभु (कोल्हापुर), 5 गुण
प्रोत्साहन पर बक्षिसे : अरिना मोदी (कोल्हापुर), वरद दिवाण (कोल्हापुर).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)