प्रपोजल स्वीकारायला आम्ही मुंडवळ्या बांधून बसलो नाही- शिवसेना

मुंबई: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप यांच्यात युती होईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र शिवसेनेने आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शिवसेना-भाजप युतीबाबत जोरदार चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी भाजपाला त्यांच्या खास शैलीत सुनावले आहे.

संजय राऊत म्हणाले, ‘चर्चेच्या प्रस्तावाच्या बातम्या केवळ राजकीय वर्तुळात फिरत आहेत. आमच्यापर्यंत कुणीही आलेलं नाही आणि प्रस्ताव स्वीकारायला शिवसेनेनं मॅरेज ब्यूरो उघडलेला नाही,’ तसेच स्वत: शिवसेनेचे पक्षप्रमुखही युतीचाप्रस्ताव देणाऱ्या सूत्रांचा शोध घेत आहेत. लोकांची प्रपोजल स्वीकारायला आम्ही मुंडवळ्या बांधून बसलेलो नाही. शिवसेना हा काही मॅरेज ब्यूरो नाही, असा कणखर टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)