प्रधानमंत्री पीकविमा योजनेत देशात जालना जिल्हा प्रथम

जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्विकारला पुरस्कार
मुंबई – सन 2016-17 या वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम करुन जालना जिल्ह्याने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. शुक्रवारी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवादिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पारितोषिक स्विकारले. जालना जिल्ह्याने मिळविलेल्या या यशाबद्दल कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील कृषी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यात 2015-16 या वर्षी खरीपात एकूण 25 कोटी विमा हप्ता भरुन पिक विमा घेतलेल्या जिल्ह्यातील जवळपास 95 टक्के शेतकऱ्यांना 431 कोटी 64 लाख रुपये आणि रब्बीमध्ये एकूण 2 कोटी विमा हप्ता भरून पिक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना 44 कोटी 29 लाख रुपये कोटी इतकी नुकसान भरपाई मिळाली. सन 2016-17 मध्ये जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून खरीपात 4 लाख 69 हजार आणि रब्बी मध्ये 1 लाख 27 हजार शेतकऱ्यांनी 39 कोटी रुपयांचा विमाहप्ता भरुन पिकविमा योजनेत भाग घेतला. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्याने देशात अग्रेसर कामगिरी केली असल्याचे कृषिमंत्री यांनी यावेळी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)