प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून दीड लाख किमी लांबीचे रस्ते 

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात चार हजार किमी रस्ते 


44 हजार वाड्या-वस्त्यांना दळण-वळणाची सुविधा 


दररोज सरासरी 116 किमी लांबीचे रस्ते 

नवी दिल्ली – प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून देशात चार वर्षात 1 लाख 70 हजार 700 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. महाराष्ट्रात या योजनेतून 3990 किमी लांबीच्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. देशातील ग्रामीण भागात रस्ते बांधणीसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हा कार्यक्रम सन 2000 यावर्षी सुरू करण्यात आला. ग्रामीण भागात दळणवळण सुविधा निर्माण करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून गेल्या चार वर्षात देशात 1 लाख 70 हजार 700 किमी लांबीचे रस्ते तयार करण्यात आले. या रस्त्यांमुळे देशातील 44 हजार 482 वाड्या-वस्त्यांना दळण-वळणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. सन 2014-15 या वर्षात देशात उद्दिष्टापेक्षा अधिक लांबीचे रस्ते बांधण्यात आले. या काळात 22 हजार किमी लांबीचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात 38 हजार किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. यामुळे 11 हजार 190 वसाहतींना दळणवळण सुविधा उपलब्ध झाली.

-Ads-

सन 2015-16 यावर्षात 33 हजार 650 किमी लांबीचे रस्ते बांधणीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात 36,449 किमी लांबीचे रस्ते बांधून 9973 वसाहतींना दळण वळण सुविधा निर्माण करून देण्यात आली. सन 2016-17 या वर्षात 11,797 वसाहती पर्यंत दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 47 हजार 447 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले, तर 2017-18 यावर्षात 48 हजार 750 किमी लांबीचे रस्ते बांधून 11,522 वसाहती जोडण्यात आल्या. गेल्या चार वर्षात महाराष्ट्रात 4 हजार किमी लांबीचे रस्ते बांधणीचे उद्दिष्ट होते. या तुलनेत राज्यात 3990 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. या रस्त्यांमुळे 163 वसाहतींना दळण वळण सुविधा उपलब्ध झाली आहे. सन 2014-15मध्ये 528 किमी, 2015-16 यावर्षात 891 किमी, 2016-17 यावर्षात 2000 किमी, तर 2017-18 या वर्षात यासाठी 570 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. सन 2018-19 या चालू वर्षासाठी ग्राम सडक योजनेतून राज्यात 500 किमी लांबीचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाने ठेवले आहे.

देशात सन 2008 पासून ते आजपर्यंत 4 लाख 9 हजार किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. या दहा वर्षात 98 हजार वसाहती रस्त्यांद्वारे जोडण्यात आल्या, तर गेल्या चार वर्षात 44,482 वस्त्या जोडण्यासाठी 1 लाख 70 हजार 700 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. या चार वर्षात दररोज सरासरी 116 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)