प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवा

महापालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार

नगर: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शहरात भाजपचा महापौर द्या, तुम्हाला 300 कोटीं देऊ अशी घोषणा केली. नगर महापालिकेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना दानवे यांनी केलेली ही घोषणा एक प्रकारे हे प्रलोभनच आहे. या संदर्भात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केतन गुंदेचा यांनी केली आहे.

गुंदेचा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नगर महानगरपालिका 2018 ची सार्वत्रिक निवडणुकीत आचारसंहिता भंगाचा गुन्हा घडला आहे. भारतीय जनता पक्षाने रविवारी (ता. 25) सायंकाळी सात वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जाहीर सभा सावेडीतील भिस्तबाग चौक येथे आयोजित केली होती. या सभेवेळी नगर जिल्हाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी हे देखील उपस्थित होते. भाजपचा प्रचार प्रारंभ करताना रावसाहेब दानवे यांनी भाषणात आचारसंहिता काळात नगरकरांना मतदान करण्याचे आवाहन करताना आमिष दाखवले.

नगरच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता दिली, तर नगरचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजप सरकार 300 कोटी रुपयांचा निधी देईल, असे त्यांनी जाहीर केले. विधान सभेचे अधिवेशन सुरू असतांना आणि नगर महानगरपालिकेची नगरसेवक पदासाठीची निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना, अशा प्रकारे नगरकरांना सरकारी योजनेचे व भरीव निधीचे आमिषाची घोषणा करणे हा प्रकारे आचारसंहिता भंगच होतो. या प्रकाराची दखल घेऊन तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गुंदेचा यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)