प्रदूषणकारी 14 कंपन्यांना नोटीस

धूर कमी करण्यासाठी तीन महिन्यांचा “अल्टिमेटम’

पुणे – औद्योगिक क्षेत्रातील 14 प्रदूषणकारी कंपन्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी या कंपन्यांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा या कंपन्यांमधून हवेत सोडल्या जाणाऱ्या धुरांचे नमुने तपासण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.

-Ads-

शहरातील औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाबाबत नोंद घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे “रिअल टाइम मॉनिटरिंग’ यंत्रणा बसविली आहेत. या व्यतिरिक्त उद्योगांसाठी “स्टार रेटिंग’ कार्यक्रमदेखील हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत कंपन्यांना त्यांच्या पर्यावरणीय कामगिरीच्या निकषानुसार मानांकन दिले जाते. चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना “फाइव्ह स्टार’ मानांकन तर सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या अथवा अत्यंत प्रदूषक कंपन्यांना एक “स्टार’ याप्रमाणे मानांकन दिले जाते. याच कार्यक्रमांतर्गत शहरातील सर्वात कमी मानांकन मिळविणाऱ्या 14 कंपन्यांना प्रदूषण करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. लवकरात लवकर प्रदूषण रोखण्याबाबत कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. या कंपन्या पिंपरी-चिंचवड, शिरूर, चाकण या भागांमधील आहेत.

याबाबत मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हर्षप्रसाद गंधे म्हणाले, “औद्योगिक क्षेत्रातील वायू प्रदूषणाबाबत तत्काळ नोंदणी घेण्यासाठी “स्टार रेटिंग’ हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरत आहे. यामुळे प्रदूषणाबाबत कोणत्या कंपन्यांची कामगिरी कशी आहे, याबाबत त्वरित माहिती मिळते. या माहितीच्या आधारे अशा कंपन्यांवर कारवाई करून प्रदुषण नियंत्रणाबाबत काम करणे अधिक सोपे झाले आहे.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)