प्रदर्शनात 147 श्‍वानांचा सहभाग

कराड – स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनस्थळी मंगळवारी घेण्यात आलेल्या श्‍वान स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध जातीचे एकूण 147 श्‍वान सहभागी झाले होते. त्यामुळे आयोजकांना स्पर्धेसाठी अकरा गट करावे लागले. ग्रेट टेन व बॉक्‍सर या गटात एकच श्‍वान सहभागी झाले होते.

विविध जातीच्या श्‍वानाचे निकाल पुढीलप्रमाणे पश्‍मी – प्रज्वल जगदाळे (नांदगाव- प्रथम), निकीता जगदाळे (नांदगाव -द्वितीय), रमेश घाडगे (विटा- तृतीय) तर संदीप थोरात (ओंड- उत्तेजनार्थ). पामेरियन – दत्तात्रय रोकडे (नेर्ले- प्रथम), अविनाश बाबर (जखिणवाडी- द्वितीय), वेदांत भोसले (मानेगाव- तृतीय). डॉबरमॅन – सुर्या पेंटस्‌ (कराड- प्रथम), योगेंद्र यादव (नारायणवाडी-द्वितीय), जगन्नाथ कांबळे (ओगलेवाडी- तृतीय), विजय कांबळे (कराडइ उत्तेजनार्थ). लॅब्रोडॉर – अमित शिंदे (कराड- प्रथम), धनंजय मोरे (सुर्ली- द्वितीय), लखन कांबळे (कराड- तृतीय), ग्रेट डेन – सचिन पवार (गोटे -प्रथम), बॉक्‍सर – रोहन पाटील (कराड- प्रथम), युटिलीटी – अरविंद कांबळे (वाई -प्रथम), अभिषेक पाटील (कराड- द्वितीय), श्रेयश भागवत (उंब्रज- तृतीय), प्रकाश काळे (मालदन- चतुर्थ). युटिलिटी – विकास देसाई (आणे -प्रथम), भूषण खैरमोडे (गोटे -द्वितीय), संभाजी इंगवले (कराड- तृतीय), ओम माळी (मुंढे ) व शिवम जानुगडे (कराड- उत्तेजनार्थ). कारवान – रोहित निकम (वरे -प्रथम), रामचंद्र बामोलकर (बामोलकरवाडी- द्वितीय), रोहन ढाणे (बोरगांव- तृतीय), प्रणय चिमण (धावडेवाडी -उत्तेजनार्थ). रॉट व्हिलटर जगन्नाथ कांबळे (ओगलेवाडी -प्रथम), रोहित शेजवळ (पाली- द्वितीय), ओंकार जाधव (मलकापूर- तृतीय), मंदार कन्हाळे (ओगलेवाडी- उत्तेजनार्थ). जर्मन शेफर्ड – प्रथमेश हबळे (सातारा- प्रथम), रत्नदिप शिंदे (कराड- द्वितीय), ओंकार काशिद (कराड- तृतीय), प्रसाद सुर्यवंशी (कराड- उत्तेजनार्थ). ग्रेहॉंड – ओंकार बाबर (जखिणवाडी- प्रथम), संकेत कांबळे (राजमाची- द्वितीय), विलास कांबळे (सुपने-तृतीय), दिपक पाटील (विऊर -उत्तेजनार्थ) क्रमांक मिळवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)