प्रथम मातृत्त्वाचा अनुभव

बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांना संसर्ग होण्याचा धोका असतो, याला प्रसूतीनंतर होणारे संसर्ग म्हणतात. बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांच्या प्रजनन भागात वायूमुळे संसर्ग होतो. महिलांची सी-सेक्‍शन डिलीव्हरी झाल्यास योनीमार्गातील घर्षणामुळे संसर्ग होण्याची भीती जास्त असते. सामान्य प्रसूतीत महिलेला दीर्घकाळ श्रम करावे लागल्यास योनीमार्गात संसर्ग होतो.

प्रसूती होणाऱ्या महिलांच्या तुलनेत ज्या महिलांच्या प्रसुतीसाठी मदत घ्यावी लागते, त्यांना संसर्ग होण्याची शक्‍यता जास्त असते. पाणी फुटल्याने जीवाणूंचा धोका संभवतो. योनी मार्गातील हे सूक्ष्मजीव गर्भाशयापर्यंत पोहोचू शकतात आणि त्यामुळे संसर्ग होण्याची शक्‍यता असते. यामुळे गर्भाशय आणि त्या शेजारील उतींना होणाऱ्या संसर्गाला प्युरपरला सेप्सिस असे म्हणतात. सी-सेक्‍शन प्रसूतीदरम्यान झालेल्या जखमांची शस्त्रक्रियेनंतर योग्य काळजी घेणे आवश्‍यक असते.

सिझेरिअन प्रसूती झालेल्या महिलांना अधिक श्रम करावे लागल्यास किंवा पडदा फाटल्यास त्यांना एन्डोमेट्रिटिस होण्याचा सर्वाधिक धोका असतो. प्रसूतीनंतर महिलांची रोगप्रतिकारकशक्ती अतिशय कमी असते. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्‍टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी प्रसूती झालेल्या महिलेची काळजी घेणे आवश्‍यक असते.

नवीन मातांना स्तनांमध्ये संसर्ग होण्याचाही धोका असतो. त्यामुळे दूध पाजत असताना महिलांना त्रास होऊ शकतो. यासोबतच स्तनाग्रांना भेग पडण्याचाही त्रास होऊ शकतो. दूध पाजताना होणाऱ्या त्रासामुळे माता मुलांना दूध पाजणे थांवू शकतात, त्यामुळे मुलांचे पोषण अपुरे राहू शकते. म्हणून यावर लगेचच उपचार होणे गरजेचे असते. स्तनपान टाळल्यामुळे साचलेल्या दुधात संसर्ग होण्याचा धोका असतो. असे दूध प्यायल्याने बाळ आजारी पडण्याची भीती असते. प्रसूतीवेळी श्रम पडल्यास महिलेला साचलेले मूत्र बाहेर सोडण्यासाठी उत्सर्जक नलिका दिली जाते, त्यामुळे योनी मार्गात संसर्ग होतो.

अस्वच्छ उत्सर्जक नलिकेमुळे संसर्ग होण्याचा धोका असतो. प्रसूतीवेळी निर्जंतुकीकरण न केल्याने या वस्तूंचा वापर केल्यामुळेही संसर्ग होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे नव्या मातेवर उपचार करताना डॉक्‍टरांनी स्वच्छता राखणे आवश्‍यक आहे. गर्भाचे वेष्टन हाताने काढल्यास किंवा गर्भाच्या वेष्टनाचा तुकडा गर्भाशयात राहिल्यास आईला संसर्ग होऊ शकतो.
हे कसे टाळता येईल?

संसर्ग झाल्याचे न समजल्यास किंवा त्यावर उपचार न झाल्यास संसर्ग धोकादायक ठरु शकतो. यामुळे मूत्रपिंडाच्या समस्या, रक्त गोठण्याची समस्या उद्भवू शकते. संसर्ग रक्तापर्यंत पोहोचल्यास सेप्टीकदेखील होऊ शकतो. त्यामुळे डॉक्‍टर स्वच्छ रुग्णालयाची निवड करण्यास सांगतात. स्वच्छ वातावरणात महिलेची काळजी घेतली जाणे अतिशय आवश्‍यक आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णांना हाताळताना हातमोजे घालणे आणि र्निजंतुकीकरण करण्यात आलेल्या साधनांचा वापर करायला हवा. योनीची तपासणी करताना र्निजतुकीकरण केलेली साधने वापरायला हवीत आणि हाताने तपासणी करायची असल्या हातमोजे घालायला हवेत. याशिवाय, नव्या मातेने स्वत:ची स्वच्छता राखणे आणि आर्द्रतेपासून स्वत:ला दूर ठेवणे गरजेचे आहे.

उपचार करताना काय करायला हवे? संसर्गाची शक्‍यता किंवा लक्षणे लक्षात येताच डॉक्‍टरांना संपर्क साधा. डॉक्‍टर त्या लक्षणांवर लगेच उपचार करु शकतात आणि प्रतिजैविक (अँटीबायोटिक्‍स) किंवा पेन किलर्स घेण्यास सांगू शकतात. त्यामुळे स्तनपान करताना त्रास होणार नाही. आंबवलेले पदार्थासोबतच अधिकाधिक द्रव पदार्थाचे सेवन करा. स्तनांना संसर्ग झाल्यास डॉक्‍टर अँटीबायोटिक्‍स व्यतिरिक्त लेप किंवा क्रिम लावण्याचा सल्ला देऊ शकतात.
-डॉ. शीतल जोशी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)