प्रत्येक हिंदु नागरीक राम मंदिराच्या बाजूने…

मथुरा – अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी या देशातील प्रत्येक हिंदु नागरीकाची इच्छा आहे असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस दिनेश शर्मा यांनी म्हटले आहे. आमची संघटनाही राम मंदिर बांधण्यासाठी वचनबद्ध आहे असे ते म्हणाले. वृंदावन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलताना ते म्हणाले की हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत आहे. त्यावर निकाल आल्यानंतर पुढील कार्यवाही होईल असे ते म्हणाले.

जर सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या विरोधात निर्णय दिला तर तुम्ही काय करणार असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यावर केंद्र सरकारने निर्णय घ्यायचा आहे. विश्‍व हिंदु परिषदेने फायरब्रॅंड नेते प्रविण तोगाडिया यांची हकालपट्टी का केली असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की संघटनेत कोणीही फायरब्रॅंड नेता नसतो. संघटनाच प्रत्येकाच्या व्यक्तीमत्वाला तशा स्वरूपाचा आकार देत असते. तोगडिया विश्‍व हिंदु परिषदेत येण्यापुर्वी त्यांना कोणी ओळखतही नव्हते अशी उपरोधिक प्रतिक्रीयाही त्यांनी दिली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)