प्रत्येक समाजाचे संघटन होणे गरजेचे – महापौर

पिंपरी – प्रत्येक समाजाचे संघटन होणे गरजेचे आहे, सध्या स्पर्धेचे युग असून समाजातील प्रत्येक गरजू घटकाला यात सामावून घेणे आवश्‍यक आहे. असे मत पिंपरी चिंचवड शहराचे महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड साऊथ इंडियन असोसिएशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना पंचरत्नम पुरस्काराने गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे उद्‌घाटन महापौर काळजे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपमहापौर शैलजा मोरे, पिंपरी चिंचवड साऊथ इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष पद्‌मनाभ शेट्टी, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, कार्याध्यक्ष राकेश नायर, सरचिटणीस सुनील गोपीनाथ, भालचंद्र शेट्टी, राकेश शेट्टी, कार्तिक कृष्णा, गणेश आंचन, प्रसाद नायर, राजेंद्र प्रसाद यांच्यासह दक्षिण भारतीय बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंचरत्न पुरस्काराने 72 वयवर्षे असलेल्या सामाजिक क्षेत्रातील भारती शेट्टी, सामाजिक आणि राजकीय दिघा उदयकुमार, कला क्षेत्रातील सुजा दिनकर, वैधकीय डॉ. प्रिया नायर आणि शैक्षणिक दीपा बसीन यांना सन्मानित करण्यात आले.

महापौर काळजे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात दक्षिण भारतीय नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक आहेत. या दक्षिण भारतीय समाजाचे संघटन होण्यासाठी एकत्रित आले पाहिजे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून जी काही मदत लागेल ती देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी महापौरांनी दिले.
असोसिएशनचे अध्यक्ष पदमनाभ शेट्टी म्हणाले की, समाजाचे संघटन होण्यासाठी पिंपरी-चिंचवड साऊथ इंडियन असोसिएशनची स्थापना केली आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवित आहोत. समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ मिळवून देण्याचे काम साऊथ इंडियन असोसिएशनतर्फे करण्यात येणार आहे. अशावेळी समाजातील संघटनामुळे गरजू घटकापर्यंत पोहचता येणे सहज शक्‍य आहे. मात्र त्यासाठी संघटन मजबूत असावे असे मत व्यक्त केले.

यावेळ साऊथ इंडियन असोसिएशन माध्यमातून सात महिला बचत गट स्थापन करण्यात आले. त्याचे उद्‌घाटन उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक आणि स्वागत राकेश नायर यांनी केले. सूत्रसंचालन अभिलाष संविधान यांनी केले. आभार राकेश शेट्टी यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)