प्रत्येक माणुस संगणक साक्षर होणे गरजेचे – हरुण आतार

सासवड- आपण ज्या ठिकाणी काम करतो. तेथे आपले योगदान खूप महत्वाचे आहे. केवळ आपली दृष्टी सकारात्मक असायला हवी. आज प्रत्येक नागरिक साक्षर आहे. पण ते संगणक साक्षर नाहीत. देशातील प्रत्येकाने संगणक साक्षर होणे गरजेचे आहे, असे मत निरंतर शिक्षणचे शिक्षणाधिकारी हरुण आतार यांनी व्यक्त केले.
सासवड (ता. पुरंदर) येथे पुरंदर तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघाच्या वतीने गुणवंत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी आतार बोलत होते. यावेळी सहाय्यक शिक्षण निरीक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबईचे अनिल गुंजाळ, जिल्हा शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष संजय धुमाळ, शिवाजी खांडेकर, नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात मुख्याध्यापक धुळा येडगे (परिंचे), शिक्षक नशिर बागवान (राजुरी), सुवर्णा होले (सासवड), लेखनिक अशोक खैरे (चांबळी), मोहन कुंभारकर (पारगाव), संजय साळुंखे (जेजुरी), मंगल जगताप (माहूर), सेवक – बापू बाणे (नायगाव), रामदास पोमण (पिंपळे), अविनाश देवकर (पांगारे), बाळासाहेब मेमाणे (मावडी क.प.), ढगोबा रोकडे (वाल्हे), शरद दळवी (हिवरे), राजेंद्रकुमार लेंभे (वीर), प्रल्हाद गरूड (जवळार्जुन) यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक किर्तीकुमार मेमाणे यांनी केले. सूत्रसंचालन वसंत ताकवले यांनी केले. तर पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष अशोक बाणे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)