प्रत्येक मंत्र्यांना मिळणार एक जनसंपर्क अधिकारी

25 हजार रुपये महिना पगार

मुंबई – मंत्रालयात आणि प्रत्येक जिल्ह्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय सक्षम काम करीत असताना आता मंत्र्याची इमेज सुधारण्यासाठी प्रत्येक मंत्री आस्थापनेवर एक जनसंपर्क अधिकारी नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.मंत्र्यांचा कालावधी असेपर्यंत हे जनसंपर्क अधिकारी कार्यरत राहणार आहेत. त्यांना दरमहा 25 हजार मानधन दिले जाणार आहे.

मंत्रिमंडळातील अनेक मंत्री सध्या विरोधकांच्या रडारावर आहे.मंत्र्यांवर झालेल्या आरोपांवर तातडीने खुलासा करणे,तसेच संबंधित मंत्र्याने आपल्या खात्याचे शासकीय निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्याबाबत सध्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कमी पडत असल्याची धारणा अनेक मंत्र्याची आहे. त्यामुळेच राज्य सरकारने एका शासन निर्णयानुसार 25 हजार रुपये मानधन तत्वावर 30 कंत्राटी जनसंपर्क अधिकारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सदर पदाचा कालावधी दोन वर्षे अथवा मंत्री मंडळाचा कालावधी संपेपर्यंत राहणार असून वर्तमानपत्र/ टी व्ही चॅनेल व विविध प्रसारमध्यमाद्वारे शासकीय योजनांना प्रसिद्धी, माध्यमांना खुलासा करणे इ.बाबींची कामे मंत्री आस्थापनेवर असलेल्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)