प्रत्येक भारतीयाने ‘उरी’ बघायलाच हवा – यामी गौतम 

“कारगिल- एलओसी’, “बॉर्डर’ आणि “लक्ष्य’ सारख्या सिनेमांमध्ये भारतीय लष्कराची शौर्यगाथा पडद्यावर मांडण्यात आली. त्यात जवानांच्या धैर्याचे आणि शौर्याबरोबरच विजय मिळवण्याच्या निर्धाराचेही दर्शन घडले. मात्र प्रत्यक्ष शत्रूच्या गोळीबारात मरण पावलेल्या जवानांच्या वेदनादायी प्रसंगांना आतापर्यंत पडद्यावर आणले नव्हते. ते आता “उरी’मधून घडणार आहे.

उरी येथे झालेल्या दहशतवादी विषयी प्रत्येकजण जाणून आहे. या अटॅकमध्ये देशातील अनेक जवान शहीद झाले होते. आता याची कथा प्रेक्षकांना पडद्यावर बघण्यास मिळणार आहे. यात विक्की कौशल आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘उरी’चा टीझर पाहायला मिळाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी यामी फारच उत्सुक आहे. हा चित्रपट तिच्या करिअरमधला खास चित्रपट आहे. यावर ती प्रतिक्रिया देत म्हणाली, ‘माझ्या करिअरमधील सर्वात खास चित्रपटांपैकी एक ‘उरी’ चित्रपट आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिग्दर्शक आदित्य धर आणि विक्की कौशल यांनी यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला हा चित्रपट दाखवायला हवा. असे यामी म्हणते. ‘उरी’मध्ये विक्की कौशल एका भारतीय कमांडोची भूमिका साकारत आहे. तसेच यात किर्ती कुलहरी आणि परेश रावल यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट 11 जानेवारी 2019 ला प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)