प्रत्येक भारतीयांनी मोदींना व त्यांच्या मंत्र्यांना राफेलवरील प्रश्‍न विचारावेत

राहुल गांधी यांची आणखी आक्रमक भूमिका

नवी दिल्ली: राफेल प्रकरणावरून सरकार आणि कॉंग्रेस मध्ये सुरू झालेले शाब्दिक युद्ध अजूनही शांत होताना दिसत नाही. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आणखी आक्रमक होत देशातील जनतेला असे आवाहन केले आहे की राफेल प्रकरणात आम्ही संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर प्रत्येक भारतीय नागरीकांनी मोदींकडे आणि त्यांच्या मंत्र्यांकडे उत्तरे मागावीत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या ट्विटर अकौंटवर त्यांनी म्हटले की संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन संसदेत राफेल वर दोन तास बोलल्या पण मी त्यांना विचारलेल्या दोन साध्या प्रश्‍नांची त्यांनी उत्तरे दिली नाहीत. अनिल अंबानी यांना राफेल कराराचे कंत्राट कोणी दिले आणि पंतप्रधानांनी राफेल प्रकरणात जी बायपास सर्जरी केली त्यावर संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता की नाही आणि मोदींनी हे आक्षेप का धुडकाऊन लावले हे प्रश्‍न प्रत्येक नागरीकाने पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्र्यांना विचारावेत.हेच प्रश्‍न मी निर्मला सीतारामन यांना विचारले होते व त्यावर होय किंवा नाही असे उत्तर देण्याची सुचना मी त्यांना केली होती पण संरक्षण मंत्र्यांनी त्याला नेमकेपणाने उत्तर न देता भलताच कांगावा सुरू केला.त्या विषयीचा व्हिडीओही त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)