प्रत्येक प्रभागातील रस्त्यांची कामे करणार ः आदिक

श्रीरामपूर – शहरातील विविध प्रभागांतील रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. प्रत्येक प्रभागांतील कामे करणार आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले.
प्रभाग क्रमांक सहामधील दळवी प्लॉट ते बनकर घरापर्यंतचा टीटाईप रस्ता, तसेच कोठेकर घरापासून ते आंबिलवादे घरापर्यंतचा टी टाईप रस्ता, तसेच कवी घरापासून ते होले घर या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा प्रारंभ नगराध्यक्षा आदिक व नगरसेवक रवी पाटील याच्या हस्ते पार पडला. यावेळी वाघ, भगवानराव होले, वराळे, बनकर, बोरले, काळे, वाकचौरे, गणेश सावंत, दिलीप राऊत, शहराध्यक्ष योगेश जाधव, स्वप्नील जाधव, सागर भागवत, वमने, कवी, बेलसरे, निर्मळ, राशीनकर, खरात व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाले की, शहरातील अनेक प्रभागातील उपनगरातील रस्त्याची, पाणी पुरवठाची कामे झाली आहे. या प्रभागातील नगरसेवक रवी पाटील यांच्या पाठपुरवामुळे या भागातील कामे सुरु झाली आहेत. काही कामे झाली आहे. अशीच कामे इतर भागात ही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरसेवक रवी पाटील म्हणाले की, पालीकेच्या माध्यमातुन सर्व सामान्याची कामे आपण करत आहोत. नगराध्यक्षा आदिक मुळे शहरातील विविध ठिकाणी विकास कामे झालेली आहेत. पुढील काळात ही कामे होणार आहेत. जनतेने अशीच साथ देत रहावी असे अवाहन पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)