प्रत्येक पक्षात घराणेशाहीच्या चुली ; कुटुंबीयांना दिली उमेदवारी

200 मतदारसंघांपैकी कॉंग्रेसने 10 तर भाजपने सुमारे 5 टक्के जागांवर नेत्यांच्या कुटुंबीयांना दिली उमेदवारी

जयपूर: मध्य प्रदेशात भाजप तर राजस्थानात कॉंग्रेस घराणेशाहीला बळ देण्याप्रकरणी अग्रेसर आहे. मध्य प्रदेशच्या 230 जागांपैकी भाजपने सुमारे 20 टक्के तर कॉंग्रेसने 10 टक्के जागांवर स्वतःच्या नेत्यांच्या कुटुंबीयांना तिकीट दिले आहे.

-Ads-

राजस्थानच्या 200 मतदारसंघांपैकी कॉंग्रेसने 10 तर भाजपने सुमारे 5 टक्के जागांवर नेत्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली आहे. काही अशीच स्थिती अन्य राज्यांमध्ये देखील आहे. असे असले तरी हे पक्ष इतर पक्षावर मात्र घराणेशाहीचे आरोप वेळोवेळी करीत आले आहेत.

मध्यप्रदेशात भाजप-कॉंगेसने 71 उमेदवारींत घराणेशाहीलाच चालना दिली आहे. हे 71 उमेदवार 68 विविध मतदारसंघांमध्ये उभे राहिले आहेत. म्हणजेच राज्याच्या 30 टक्के जागांवर घराणेशाहीचेच वर्चस्व आहे. राज्यात भाजपने 230 पैकी 48 तिकीट स्वतःच्या नेत्यांचे बंधू, भगिनी, सून, पुत्र, पत्नी किंवा कुटुंबातील अन्य सदस्याला प्रदान केले आहे.
यातील 34 तिकीट पुत्र-कन्या आणि 14 तिकीट कुटुंबाच्या अन्य सदस्याला देण्यात आले आहे. याचप्रकारे कॉंग्रेसने 23 तिकीट नेत्यांच्या कुटुंबीयांना प्रदान केले आहे. यातील 14 उमेदवार नेत्यांचे पुत्र किंवा कन्या तर 9 ठिकाणी अन्य सदस्यांना संधी मिळाली आहे. हा त्या मतदारसंघात चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
59 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)