प्रत्येक जिल्ह्याचा जीडीपी वाढवण्याचा प्रयत्न – सुरेश प्रभु 

पणजी: जीडीपी वाढवण्यासाठी स्थानिक पातळीपासून प्रयत्न करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला असून आता प्रत्येकी जिल्ह्याच्या पातळीवर जीडीपी म्हणजेच विकास दर वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यांनी दिली आहे. असोचॅमच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की जिल्हा निहाय जीडीपी वाढवण्याचा प्रयत्न केला तर देशाचा जीडीपी वाढू शकतो. त्यानुसार आम्ही आता प्रत्येक जिल्ह्याचा जीडीपी मोजण्याचे काम हाती घेत असून हा जीडीपी तीन ते चार टक्कक्‍यांनी वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले.

लघु, छोटे आणि मध्यम उद्योग क्षेत्रात अन्न प्रक्रिया प्रकल्पांना चालना देण्याचा आमचा मनोदय आहे त्यासाठी नाबार्ड सारख्या संघटनांच्या सहकार्याने आणि राज्य सरकारांच्या मदतीने आम्ही हे काम हाती घेत आहोत असे ते म्हणाले. या प्रकल्पाची सुरूवात म्हणून आम्ही पाच वेगवेगळ्या राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये हे काम हाती घेतले आहे. त्यासाठी बिहार मधील मुज्जफरपुर, उत्तरप्रदेशातील वाराणसी, आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम, महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधदुर्ग आणि हिमाचल प्रदेशातील एक जिल्हा आम्ही निवडला आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ ऍप्लाईड इकॉनॉमिक्‍स रिसर्च या संस्थेने यासाठी बेसलाईनचा सर्व्हे करण्याचे काम हाती घेतले आहे असे ते म्हणाले. सरकारची ईज ऑफ डुईंग बिझनेस ही संकल्पना आम्ही स्थानिक पातळीपासून सुरू करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)