प्रत्येकाने सामाजिक कार्य जबाबदारी म्हणूनच करायला हवे

नगर – समाजामध्ये दिवसेंदिवस शहरीकरण वाढत असून, गाव-खेड्यांमध्ये हातांना काम नाही. तेथील लोक कामानिमित्त शहराकडे वळायला लागले असून, शहरीकरण वाढत आहे व काम नसल्यामुळे दारिद्र वाढत आहे. तंत्रज्ञान वाढत आहे, परंतु संस्कार कमी होत चालले आहे. महागाईमुळे समाजामध्ये गरजूंची संख्या प्रत्येक क्षेत्रात वाढत चालली आहे, अशा वेळी समाजातील प्रत्येक नागरिकांनी सामाजिक कार्य हे आपली जबाबदारी म्हणूनच पार पाडले पाहिजे, असे प्रतिपादन कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अभय परमार यांनी केले.

माणिक चौक येथील शाह चष्मावाला यांनी चष्म्याचे नवीन दालन सुरु केले, त्याचे उदघाटन त्यांनी एक नवीन उपक्रमाने केले की समाजामध्ये जे लोक शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, नेत्रेरोग व इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक काम करणार्यांचा समाजमित्र, आरोग्यमित्र, नेत्रमित्र अशा पुरस्काराने शाल, गुच्छ, सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला व आपल्या दालनाची सुरुवात केली. याप्रसंगी अभय परमार बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि.अभिजित वाघ, इतिहासप्रेमी मंडळाचे कॉ.बहिरनाथ वाकळे, राष्ट्रवादीच्या रेखा जरे, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक इंजि.अनिस शेख, डॉ.शमा फारुकी, नलिनी गायकवाड, सय्यद वहाब, नूर साहब, नगरसेवक फैय्याज शेख आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)