प्रत्येकाने व्यवसायाकडे वळावे : ना. नरेंद्र पाटील

कराड – नोकरीच्या मागे न लागता प्रत्येकाने व्यवसायाची कास धरणे गरजेचे बनले आहे. युवक व महिलांनी विविध योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय उभारल्यास महामंडळ त्या कर्जाचे व्याज भरेल, अशी ग्वाही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांनी दिली.

येथील प्रधानमंत्री कौशल केंद्राच्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे जिल्हा समन्वयक राहुल यादव उपस्थित होते. प्रधानमंत्री कौशल केंद्राच्या प्रशिक्षणाचा यावेळी अनेक महिलांनी लाभ घेतला. ना. पाटील म्हणाले, नोकरीमध्ये आज प्रचंड स्पर्धा चालली आहे. अनेक तरुण नोकरीविना बेकार आहेत. तर काही जण तुटपुंज्या पगारावर बारा ते चौदा तास राबताना दिसतात.

इतरांप्रमाणे आपणही व्यवसायात उतरुन प्रगतीकडे वाटचाल करणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी प्रधानमंत्री कौशल केंद्रामार्फत अनेक व्यवसायाचे मोफत मार्गदर्शन दिले जात आहे. हे कोर्स पूर्ण करुन महिलांनी व्यवसायाकडे वळावे. महिलांनी एकत्रित येऊन व्यवसाय उभारल्यास त्या व्यवसायाला लागणाऱ्या कर्जाचे व्याज महामंडळाकडून भरले जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री कौशल केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या विविध कोर्सची माहिती राहुल यादव यांनी देवून आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)