प्रत्येकाचे कर्तुत्व समाजोपयोगी असायला हवे!

संग्राम महाराज : काळेवाडी येथे हरिनाम सप्ताह

पिंपरी – पैसा कितीही कमावला तरीही त्याचा उपयोग नाही. तुमच्यावर संस्कार कसे झाले आहेत, त्यावर तुमचे समाजातील स्थान ठरत असते. तुमचे कतृत्व हीच तुमची ओळख आहे. त्यावरूनच तुमचे आईवडील, कुटुंब आणि गावाची ओळख होते. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार करा आणि त्यांच्याकडून कतृत्व समाजोपयोगी राहील असे त्यांना घडवावे, असे मत संग्राम महाराज भंडारे पाटील यांनी व्यक्त केले.

अधिक महिन्यानिमित्त काळेवाडी येथे विठ्ठलराज भजनी मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहातील पाचव्या दिवसाचे कीर्तन हभप काळजेमहाराज यांनी सादर केले. संत तुकाराम महाराज यांचा पवित्र तो देह पापी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्वकाळ, तयाच्या चिंतनी तरतील दोषी, जळतील राशी पाचटांच्या’ या अभंगाचे निरुपण त्यांनी केले. माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे पाटील, नगरसेविका सविता खुळे, नीता पाडाळे, करुणा चिंचवडे, उषा काळे, बजरंग नढे, सखाराम नखाते, मधुकर काळे, संतोष माचुत्रे आदी या वेळी उपस्थित होते. अंजनाबाई राऊत आणि शांताराम राऊत या दाम्पत्याचा या वेळी सत्कार करण्यात आला.

संग्राम महाराज म्हणाले की, स्मार्ट फोन सोशल मीडिया’ची लाट घेऊन आला. याचा आनंद घेण्याऐवजी आजची तरुणाई त्यात बुडत आहे. हेलकावे खात आहे. स्वमग्न होत आहे. त्यामुळे आपली आजची पिढी उध्वस्त होत आहे. यासाठी वेळीच प्रबोधन झाले पाहिजे. पालकांनी सतर्क झाले पाहिजे. तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. त्याचा सकारात्मक वापर झाला पाहिजे. चांगले विचार समाजापर्यंत पोहचविण्यासाठी या माध्यमांचा वापर झाला पाहिजे. त्यासाठी मुलांना चांगले आणि वाईट यातील फरक सांगितला पाहिजे. त्यांच्यावर योग्य संस्कार झाले पाहिजेत. म्हणजे ती भरकटणार नाहीत. मराठी माणसाने जागृत झाले पाहिजे. आपलीच माणसे आपले पाय खेचतात. प्रेमविवाह टिकत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे विवाह संस्कृती जपली पाहिजे. तारुण्य वाया घालवू नका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)