प्रत्यक्ष कृती दिसेपर्यंत उत्तर कोरियावरील निर्बंध कायम राहणार

वॉशिंग्टन – उत्तर कोरियाने स्वत:हून अण्विक चाचण्यावर तसेच क्षेपणास्त्र चाचण्यांवर निर्बंध घातले आहेत. तथापी त्यांची तेवढी घोषणा पुरेशी नसुन आपल्याकडील अण्विक क्षेपणास्त्रे त्यांनी नष्ट करणे अपेक्षित आहे. त्या दिशेने त्यांची प्रत्यक्ष कृती दिसेपर्यंत त्यांच्यावरील निर्बंध लागूच राहतील असे अमेरिकेने म्हटले आहे. आम्ही त्यासाठी त्यांच्यावर अधिक दबाव टाकू असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्‍त्या सारा सॅंडर्स यांनी आज पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असून त्यासाठी त्यांनी ट्रम्प यांना दिलेले निमंत्रण ट्रम्प यांनी स्वीकारले आहे. तशातच त्यांनी अण्विक चाचण्यांवर स्वत:हून बंदी घातली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील निर्बंध आता शिथिल केले जातील काय असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला होता त्याला उत्तर देताना सॅंडर्स यांनी हे उत्तर दिले. ट्रम्प आणि किम यांच्यातील थेट चर्चेच्यावेळी याही विषयावर थेट तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. ही चर्चा नेमकी कोठे होणार याचा तपशील अजून ठरलेला नाही पण त्या भेटीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)